शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गगनयानाच्या बुस्टरची गुणवत्ता पुण्यात होणार सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:29 IST

निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गगनयान हा भारताची महत्वाकांशी प्रकल्प आहे. गगनयानाच्या उड्डाणासाठी लागणारे बुस्टर ...

निनाद देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गगनयान हा भारताची महत्वाकांशी प्रकल्प आहे. गगनयानाच्या उड्डाणासाठी लागणारे बुस्टर पुण्यातील वालचंदनगर कंपनीत तयार होणार आहे. बुस्टर उभारणी बरोबरच आता बुस्टरच्या गुणवत्ता चाचणीचाही प्रकल्प कंपनीने उभारल्याने अंतिम प्रक्षेपणापूर्वीच्या सर्व चाचण्या या कंपनीतच करता येणार आहे. केवळ दीड वर्षात हा प्रकल्प कंपनीने उभारला असून अशी क्षमता असणारी वालचंदनगर कंपनी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

गगनयान ही भारताची पहिली मानवरहित अंतराळ मोहिम आहे. २०२०मध्ये ही मोहिम राबविली जाणार होती. मात्र, कोरोनामुळे गगनयानाचे प्रक्षेपण लांबले. असे असले तरी या मोहिमेचे सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केले आहे. मुख्य यानाबरोबर हे यान अंतराळात पाठवण्यासाठी जीएसएलव्ही मार्क ३ या भारताच्या बाहूबली प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. बुस्टर बनविन्याबरोबरच बुस्टरची क्षमता तपासण्याचा प्रकल्पही कंपनीत उभारला आहे. विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे निदेशक एस. सोमनाथ तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने या प्रकल्पाचे उदघाटन १८ डिसेंबर ला कंपनीच्या आवारात होणार आहे.

चौकट

गगनयानासह भविष्यातील मोहिमांचा वाचणार वेळ

प्रक्षेपकाच्या बुस्टरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिउच्च ज्वलनशील असे इंधन असते. हे इंधन साठवण्याची ताकद या बुस्टरमध्ये असावे लागते. पूर्वी हे बुस्टर कंपनीत तयार झाल्यावर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) तपासणी केंद्राकडे पाठवीले जात होते. त्या ठिकाणी चाचण्या यशस्वी झाल्यावरच प्रक्षेपणासाठी हे बुस्टर वापरले जात होते. एखादा दोष आढळल्यास कंपनीचे तंत्रज्ञ त्या ठिकाणी जाऊन तो दूर करत होते. यात बराच वेळ जात होता. मात्र, या नव्या प्रकल्पामुळे हा वेळ आता वाचणार आहे.

---

अशी होणार गुणवत्ता चाचणी

प्रक्षेपकाला लागणारे बुस्टरचा व्यास हा ९ मीटर असतो. हे बुस्टर प्रक्षेपकासाठी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी बुस्टरमध्ये नव्या यंत्रणेच्या साह्याने द्रवरूप पदार्थ टाकून त्यात हवेचा दबाव निर्माण केला जातो. यासाठी चार मजली उंच असलेली यंत्रणा बांधण्यात आली आहे. बूस्टरचे सर्व सुटे भाग एकत्र करून त्यांची दबाव सहन करण्याची क्षमता तपासली जाते. यात काही त्रुटी आढळल्यास संगणकाच्या आणि प्रत्यक्ष तंत्रज्ञाच्या साह्याने त्या दुर केल्या जातात.

चौकट

क्रू एस्केप सिस्टिमही करणार तयार

गगनयान मोहिमेच्या प्रक्षेप यादरम्यान एखादा अपघात झाल्यास अंतराळवीरांचा जीव वाचवण्यासाठी क्रू एस्केप सिस्टिमही कंपनीत तयार करत आहे. यानाचा स्फोट झाल्यास आपोआप या यंत्रणेमुळे यानाचा अंतराळवीर असलेला भाग हा यानापासून दूर होईल. हा प्रकल्प प्राथमिक स्थरावर असून त्याचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे.

कोट

चंद्रयान मोहिमेतही महत्वाची भूमिका आम्ही पार पाडली होती. बूस्टर गुणवत्ता चाचणी प्रकल्पाबाबत इस्रोने मागणी केली होती. त्यानुसार केवळ दीड वर्षात आम्ही हा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पामुळे वेळेत बूस्टरची गुणवत्ता तपासता येणार आहे. यामुळे अंतराळ मोहिमेतील अपघात टाळता येणार आहे.

-चिराग दोषी, व्यवस्थापकीय संचालक वालचंदनगर इंडस्ट्रीज