शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पीएसआयसाठी मैदानी चाचणी पात्र केली; राज्यसेवा परीक्षेसाठी सीसॅट कधी पात्र करणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमोल अवचिते पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) कडून घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमोल अवचिते

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (एमपीएससी) कडून घेतल्या जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदासाठी मैदानी चाचणी पात्र करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर राज्यसेवा परीक्षेसाठी पूर्वपरीक्षेला असणारा सीसॅट हा पेपर कधी पात्र करणार?, असा प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

एमपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षा पद्धीतीचे अनुकरण करते. त्याप्रमाणे एमपीएससीने यूपीएससीच्या धर्तीवर सीसॅट पेपर लागू केला. तसेच काही दिवसांपूर्वी यूपीएससीप्रमाणे परीक्षा देण्यावरही मर्यादा घातल्याचा निर्णय घेतला. यूपीएससीने लागू केलेल्या सीसॅट पेपरमुळे ग्रामीण भागातील उमेदवारांचे नुकसान होत असल्याचे कारण पुढे करून उमेदवारांनी विरोध केला. त्यानुसार अरुण निगवेकर आणि अरविंद कुमार या दोन समित्या स्थापन करून सीसॅट केवळ पात्र करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर एमपीएससीने विचार करून वेळीच सीसॅट पात्र करावे, अशी मागणी गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येत आहे. मात्र, सीसॅटच्या निर्णयाचे अनुकरण करण्यासाठी एमपीएसी का थांबली आहे ?, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे.

स्पर्धा परीक्षेत समान संधी असणे आवश्यक आहे. सीसॅट पेपरचे गुण ग्राह्य धरून मुख्य परीक्षेसाठी निवड केली जाते. यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना याचा फटका बसत असून नुकसान होत आहे. त्यामुळे समसमान संधीचे धोरण येथे लागू होत नाही. विशिष्ट शाखेतीलच उमेदवारांना याचा फायदा होत आहे. सीसॅट पात्र करण्याच्या निर्णयात नेमके कोण आडकाठी करीत आहे, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

कोट

पाच वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. नेमके याच मुद्यावर यूपीएसीचे अनुकरण एमपीएससी करत नाही. सामान्य अध्ययन पेपरमध्ये अपेक्षित गुण असून केवळ सीसॅट पेपरमध्ये काही गुण कमी पडल्याने मुख्य परीक्षा देता आली नाही.

ज्योतीराम जाधव, परीक्षार्थी

सीसॅट पात्र करावा असे अनेक स्पर्धा परीक्षेतील तज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार आम्ही एमपीएसीला अनेकवेळा मागणी केली आहे. यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

महेश बडे, एमपीएससी स्टुडंट राईट्स