शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील वसाहतींवर टांगती तलवार

By admin | Updated: February 4, 2016 01:41 IST

हरित न्यायाधिकरणाने नदीपात्रातील रस्ता उखडून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने नदीपात्रातील काही वसाहतींना नोटिसा बजावल्या आहेत

पुणे : हरित न्यायाधिकरणाने नदीपात्रातील रस्ता उखडून टाकण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेने नदीपात्रातील काही वसाहतींना नोटिसा बजावल्या आहेत. ‘तुमची घरे अधिकृत असल्याबाबतची कागदपत्रे पालिकेला मुदतीत सादर करावीत; अन्यथा पुढील कार्यवाही करण्यात येईल,’ अशी धमकीही या नोटिशीत देण्यात आली आहे. १४२ सदनिकांमधील रहिवासी पालिकेच्या या तुघलकी कारभाराने हैराण झाले आहेत.नदीपात्रातील रस्ता बांधणीचे प्रकरण पालिकेच्या अंगलट आले आहे. काही संस्थांनी या रस्त्याच्या विरोधात हरित न्यायाधिकरणात दाद मागितली. नदीपात्रातील रस्त्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे असा त्यांचा मुद्दा होता. रस्ता तयार करताना पालिकेने बऱ्याच नियमांचे उल्लंघन केले. त्याचा आधार घेत केलेल्या या याचिकेचा निकाल पालिकेच्या विरोधात गेला. पालिकेने उच्च न्यायालयात अपील केले. तिथेही निकाल त्यांच्या विरोधात गेला. त्यानंतर या निकालाला पालिकेने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र तिथेही त्यांना हार खावी लागली. त्यामुळे काही कोटी रुपये खर्च केलेला हा रस्ता उखडण्यासाठी पालिकेला पुन्हा काही कोट रुपये खर्च करावे लागले.या निकालामुळे पालिका प्रशासन ताकही फुंकून पिऊ लागले आहे; मात्र त्याचा त्रास कर्ज काढून घरे घेतलेल्या रहिवाशांना होत आहे. नदीपात्राच्या कडेने गेल्या काही वर्षांत अनेक वसाहती झाल्या. पूर्वी या परिसराचा काही भाग पालिका हद्दीत तर काही ग्रापंचायतीच्या हद्दीत होता. त्या वेळीही पूररेषेची पाटंबधारे खात्याने निश्चित केलेली हद्द पाहूनच बांधकामांना परवानगी दिली जात होती. गेल्या काही वर्षांत हा सर्वच परिसर पालिकेच्या हद्दीत आला. ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामांना पालिकेने गुंठेवारीचा कायदा लावून अधिकृत करून घेतले. त्यासाठी शुल्क वसूल केले. नव्याने अनेक बांधकामांना परवानगी दिली.मात्र, आता यातील काही बांधकामे पूररेषेच्या आत असल्याचा साक्षात्कार पालिकेच्या बांधकाम विभागाला झाला आहे. न्यायाधिकरणाच्या निर्णयाचा आधार घेत पालिकेने १४२ सदनिकांमधील रहिवाशांना या नोटिसा दिल्या आहेत. पालिकेच्याच परवानगीने, पाटंबधारे विभागाने निश्चित केलेल्या पूररेषेच्या आधारे बांधकाम व्यावसायिकांनी बांधलेली घरे आयुष्यभराची कमाई टाकून किंवा कर्ज काढून विकत घेतलेल्या या कुटुंबांवर पालिकेच्या या नोटिशीने संक्रातच आली आहे. यातील अनेकजण हतबल झाले आहेत. रस्ता उखडण्याबाबतच्या निर्णयामुळे तर त्यांना आपल्या घरावरही हातोडा पडणार, असे वाटू लागले आहे.