शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांघिक गटात पीवायसी ‘अ’ चॅम्पियन

By admin | Updated: April 24, 2017 05:05 IST

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित प्रौढांच्या पहिल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सेंच्युरी वॉरियर्स ‘अ’ संघाचा ३-०ने सहजपणे पराभव करून

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने आयोजित प्रौढांच्या पहिल्या राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत सेंच्युरी वॉरियर्स ‘अ’ संघाचा ३-०ने सहजपणे पराभव करून पीवायसी ‘अ’ संघाने रविवारी विजेतेपदाला गवसणी घातली. पीवायसी हिंदू जिमखान्याच्या कम्युनिटी हॉलमध्ये ही स्पर्धा झाली. सांघिक गटाच्या अंतिम फेरीत पीवायसी ‘अ’ने सेंच्युरी वॉरिअर्स ‘अ’वर ३-०ने सहजपणे सरशी साधली. उपेंद्र मुळ्ये आणि रोहित चौधरी या स्टार खेळाडूंनी अप्रतिम खेळ करीत पीवायसी ‘अ’च्या विजेतेपदात निर्णायक योगदान दिले. उपेंद्रने विवेक अलवानीवर ११-६, ५-११, ११-८, १२-१०ने, तर रोहितने सुनील बाबरसवर ११-९, १०-१२, ११-६, ४-११, ११-९ ने मात केली. सुनील बाबरसला दुखापत झाल्यामुळे सुनील-विवेक जोडीने दुहेरी लढतीतून माघार घेतली. यामुळे उपेंद्र-रोहित जोडीला विजयी घोषित करण्यात आले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरींच्या लढतीत पीवायसी ‘अ’ने झुंजार खेळ करीत सोलापूर ‘अ’चे कडवे आव्हान ३-२ने संपुष्टात आणले. यात ३ सामने जिंकणारा रोहित चाध्ौरी पीवायसी ‘अ’च्या विजयाचा शिल्पकार ठरला. दुसऱ्या उपांत्य लढतीत सुनील बाबरसच्या शानदार खेळाच्या जोरावर सेंच्युरी वॉरियर्सने गोमांतक ‘अ’ संघावर ३-१ने मात केली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण अरूण डेव्हलपर्सचे अरूण गुप्ता आणि राज्याच्या महसूल खात्याचे रजिस्ट्रार दिगंबर रौंदाळ यांच्या हस्ते झाले. या वेळी स्पर्धा आयोजन समिती प्रमुख डॉ. प्रमोद मुळ्ये, पीवायसीचे व्यवस्थापन समिती सदस्य गिरीश करंबेळकर, क्लब सेक्रेटरी वसंत चिंचाळकर, प्रोटोकंट्रोल इन्स्ट्रुमेंट्सचे रवींद्र परळे, पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे श्रीराम कोनकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.निकाल : सांघिक गट : उपांत्य फेरी : पीवायसी ‘अ’ विवि सोलापूर ‘अ’ : ३-२ (रोहित चौधरी विवि डॉ. नितीन तोष्णीवाल ११-३, ९-११, ११-७, ८-११, ११-३. उपेंद्र मुळ्ये पराभूत वि. मनीष रावत ८-११, ४-११, ११-७, १०-१२. उपेंद्र मुळ्ये-रोहित चौधरी विवि डॉ. नितीन तोष्णीवाल-मनीष रावत ११-६, ११-२, ११-७. उपेंद्र मुळ्ये पराभूत वि. डॉ. नितीन तोष्णीवाल ८-११, ११-९, ९-११, ११-७, १५-१७. रोहित चौधरी विवि मनीष रावत ११-१३, ११-७, ११-५, ५-११, ११-५).सेंच्युरी वॉरियर्स ‘अ’ विवि गोमांतक ‘अ’ : ३-१ (सुनील बाबरस विवि समीर भाटे ११-८, ११-५, ११-५. विवेक अलवानी पराभूत वि. के. के. रॉय १०-१२, ९-११, २-११. सुनील बाबरस-विवेक अलवानी विवि के. के. रॉय-राम कदम ११-९, ११-९, ११-५. सुनील बाबरस विवि के. के. रॉय ११-९, ९-११, १३-११, ११-८).अंतिम फेरी : पीवायसी ‘अ’ विवि सेंच्युरी वॉरियर्स : ३-० (उपेंद्र मुळ्ये विवि विवेक अलवानी ११-६, ५-११, ११-८, १२-१०. रोहित चौधरी विवि सुनील बाबरस ११-९, १०-१२, ११-६, ४-११, ११-९. उपेंद्र मुळ्ये-रोहित चौधरी विवि सुनील बाबरस-विवेक अलवानी : बाबरस यांना झालेल्या दुखापतीमुळे त्यांनी सामना सोडून दिला).(क्रीडा प्रतिनिधी)