शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला धक्का

By admin | Updated: October 20, 2014 02:16 IST

तालुक्यातील नेत्यांनाच एकमेकांत झुंजवत ठेवून स्वत:चे महत्त्व अबाधित राखण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेतृत्वाची खेळी पुणे जिल्ह्यातच त्यांच्यावर उलटली.

पुणे: तालुक्यातील नेत्यांनाच एकमेकांत झुंजवत ठेवून स्वत:चे महत्त्व अबाधित राखण्याची राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेतृत्वाची खेळी पुणे जिल्ह्यातच त्यांच्यावर उलटली. त्यामुळे राज्यात इतरत्र बरी कामगिरी करत असताना पुण्याच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. राष्ट्रवादीच्या गेल्या वेळी जिल्ह्यात ६ जागा होत्या. त्या या वेळी अर्ध्याच झाल्या. इंदापूरमधील प्रतिष्ठेची जागा आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळाले असले तरी जुन्नर, खेड, शिरूर आणि दौंड या जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या. अपेक्षेप्रमाणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी विजय मिळविला असला तरी इतरत्र मात्र राष्ट्रवादीला जबर पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे खेड आणि दौंडमध्ये राष्ट्रवादीच्याच बंडखोरांनी इतर पक्षांत प्रवेश करून विजय मिळविला. खेडमध्ये गेल्या वेळी तिकीट देऊनही दिलीप मोहिते यांच्या दबावाखाली ऐनवेळी सुरेश गोरे यांना उमेदवारी नाकारली. मोहिते यांच्या विरोधात तालुक्यातील नेत्यांनीच परिवर्तन आघाडी उघडली होती. त्यातील गोरे शिवसेनेकडून आणि शरद बुट्टे-पाटील हे भाजपकडून लढून राष्ट्रवादीच्या पराभवाचे कारण ठरले. दौंडमध्ये कुल-थोरात या गटाला एकत्र करण्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला अपयश आले. त्यामुळे कुल यांनी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करून विजय मिळवित राष्ट्रवादीला धक्का दिला. शिरूरमध्ये बाबूराव पाचर्णे यांना गेल्या वेळी पक्षात घेऊन ऐनवेळी तिकीट नाकारले. त्या नाराजीतून गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा त्यांनी यंदा भाजपची उमेदवारी घेऊन काढला. जुन्नरमध्ये तर राष्ट्रवादीचे अतुल बेनके तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. येथे मनसेचे शरद सोनवणे यांनी अनपेक्षितपणे बाजी मारली. इंदापूरची जागा प्रतिष्ठेची करून राष्ट्रवादीने हर्षवर्धन पाटील यांना कोंडीत पकडले होते. सर्व ताकद पणाला लावून हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. कॉँग्रेसला जिल्ह्यात केवळ भोरमध्ये संग्राम थोपटे यांच्या रूपाने अस्तित्व टिकविता आले आहे. पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचे तब्बल २९ इच्छुक होते. त्यामुळे एकत्रित प्रचार झालाच नाही आणि अशोक टेकवडे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. कॉँग्रेसचे संजय जगताप यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. मावळमध्ये राष्ट्रवादी प्रथमच एकत्रित लढत होती. मात्र, कॉँग्रेसने घेतलेली मते आणि मोदीलाटेमध्ये माऊली दाभाडे यांचा टिकाव लागला नाही. भाजपचे बाळा भेगडे यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला. चार महिन्यांत तीन वेळा पक्षांतर करणारे लक्ष्मण जगताप चिंचवडमधून विजयी झाले. भोसरीतून गेल्या वेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या विलास लांडे यांना यंदा अपक्ष महेश लांडगे यांनी पराभूत केले. (प्रतिनिधी)