शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीकरांना देणार शुद्ध पाणी

By admin | Updated: January 1, 2015 23:43 IST

भामा आसखेडहून पुण्याला जाणाऱ्या पाईपलाईनमधूनच आळंदीसह सहा गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

चाकण : भामा आसखेडहून पुण्याला जाणाऱ्या पाईपलाईनमधूनच आळंदीसह सहा गावांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. युतीचे सरकार असल्याने आळंदीकरांना लवकरच शुद्ध पाणी देणार, असे आमदार सुरेश गोरे यांनी आज आळंदीत सांगितले.तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुरेश गोरे यांनी आज आळंदीत नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. आळंदी पालिकेचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, उपनगराध्यक्षा अंजना कुऱ्हाडे, नगरसेवक अशोक कांबळे, अलका बवले, वर्षा कोद्रे, सेनेचे जिल्हाध्यक्ष राम गावडे, रमेश गोगावले, अ‍ॅड. विलास काटे, महादेव पाखरे, मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची प्रमुख उपस्थिती होती.गोरे म्हणाले की, भामा आसखेडचे पुण्याला जाणारे पाणी आळंदीतून जात असल्याने प्रथम आळंदीकरांना पाणी देत नाही, तोपर्यंत पुण्याला जाणाऱ्या पाईपलाईनचे काम अडविले जाणार आहे. आळंदी आणि परिसरातील गावांना भामा आसखेडचे पाणी देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सध्या शासन स्तरावरील अंतिम टप्प्यातील आळंदी शहर प्रारूप विकास आराखड्यास मुख्यमंत्री स्तरावर मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्य तीर्थ क्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून कामे संथ गतीने होत आहे, शहरातील रस्ते, गटारे, पिण्याची पाईपलाईन ही कामे निधी असूनही वेळेत झाली नाहीत. लवकरच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची आळंदीत बैठक होऊन कामे गतीने होण्यासाठी भर देणार आहे. रस्त्यांचा विकास करताना, अतिक्रमण कारवाई करताना हयगय केली जाणार नाही. कामे वेळेत झाली नाहीत तर निधी पुन्हा माघारी जाण्याची शक्यता असल्याची माहिती गोरे यांनी दिली. (वार्ताहर)आळंदी पालिकेने जिल्हास्तर नगरोत्थान अभियानांतर्गत मिळालेल्या सत्तर लाख निधी आणि पालिकेच्या वीस लाख असे एकूण नव्वद लाख रूपयांतून आळंदीतील सिद्ध बेट मधील जलशुद्धीकरण यंत्रणेतील जुनाट यंत्रे, व्हॉल्व, पाईप बदलण्याचे काम सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड, फिल्टर मीडिया बनविण्याचे काम झाले आहे. सेटलिंक टँक बनविला असून, लवकरच दोन दिवसांत आळंदीकरांना पूर्वीपेक्षा चांगले पाणी मिळणार आहे.- विनायक औंधकर, मुख्याधिकारी