शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदरमध्ये होणार ३८० कोटी लिटर पाणीसाठा

By admin | Updated: March 22, 2016 01:46 IST

शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त कामे झालेली असून, सरासरी एवढे पर्जन्यमान राहिले

जेजुरी : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पुणे जिल्ह्यात सर्वांत जास्त कामे झालेली असून, सरासरी एवढे पर्जन्यमान राहिले, तर सुमारे ३८० कोटी लिटर पाणीसाठा होऊ शकेल, अशी खात्री पुरंदरचे तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुरंदर तालुक्यात सन २०१५-१६ या वर्षात दिवे, सोनोरी, पानवडी, वाल्हे, नावळी, पिंगोरी, साकुर्डे, वाळुंज, गुळुंचे, एखतपूर, सटलवाडी, काळदरी, देवडी, भिवडी, मांढर, टेकवडी, नवलेवाडी, परिंचे, तक्रारवाडी, शिवरी, पांडेश्वर, सिंगापूर या बावीस गावांतून जलयुक्त शिवारअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली. पाझर तलाव, नाले, ओढे खोलीकरणाची कामे लोकसहभागातून झाली आहेत. शासनाचे कृषी विभाग, लघुसिंचन, छोटे पाटबंधारे विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, भूजल सर्वेक्षण या सर्व यंत्रणांमार्फत या बावीस गावांचा ६० कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला होता. प्रत्यक्षात ४७ कोटी रुपये खर्चाची ७४७ कामे हाती घेण्यात आली होती. पैकी ५५७ कामे सुरू असून, यातील ४३२ कामे पूर्ण झालेली आहेत. तर, १२५ कामे सुरू आहेत. यासाठी आतापर्यंत सुमारे १७ कोटी ३३ लाख रुपये खर्च झालेला आहे. यातून १७ लाख ४२ हजार घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. यामुळे या वर्षी ३८० कोटी लिटर पाणीसाठा होऊ शकतो. अजून खूप कामे होणार आहेत. याशिवाय या वर्षीही सण २०१६-२०१७ या वर्षात अजून २३ गावांचा समावेश या योजनेत केलेला आहे. यात बेलसर, पांगारे, पिंपरी, खळद, घेरापुरंदर, आसकरवाडी, कोळविहिरे, हरणी, खानवडी, दौंडज, राख, नायगाव, माळशिरस, भिवरी, वनपुरी, पिसुर्टी, कर्नलवाडी, गराडे, कोडीत, कोथळे, पिसर्वे, पोंढे, बोर्हारळवाडी या गावांचा समावेश असून, या गावासाठी साधारणपणे ४४ कोटी ९२ लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या खर्चातून सुमारे २२०० कामे प्रस्तावित करण्यात आलेली असून, एप्रिलपासून याही कामांना सुरुवात केली जाणार आहे, असेही तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. >पुणे जिल्ह्याचा विचार करता सर्वांत जास्त काम पुरंदर तालुक्यात झालेले असून, पावसाळ्यात पर्जन्यमान जर व्यवस्थित राहिले, तर मोठा पाणीसाठा होऊ शकतो.जेथे ही कामे झालेली आहेत त्या ठिकाणी किमान दोन वर्षे पाणीटंचाई जाणवणार नाही, असा दावाही ढगे यांनी केला आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत काम करण्यासाठी गावागावांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोकसहभाग, संस्था, कंपन्याही या कामासाठी सहकार्य करीत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. अशाच प्रकारचा सहभाग व प्रतिसाद लाभला. यामुळेच मोठ्या प्रमाणावर काम होऊ शकले.