शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या ‘वॉटर कप’साठी पुरंदर, इंदापूरचा समावेश

By admin | Updated: January 9, 2017 02:30 IST

सिनेअभिनेते आमिर खान हे स्वत: शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत सहभागी झालेले असून, त्यांनी पाणी फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे.

जेजुरी : सिनेअभिनेते आमिर खान हे स्वत: शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत सहभागी झालेले असून, त्यांनी पाणी फाउंडेशन ही संस्था स्थापन केली आहे. या संस्थेकडून राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणी जतन व संवर्धनाचे मोठे काम उभे करण्याचे नियोजन केलेले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींनी लोकसहभागासह पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने यांनी केले आहे. पुरंदर पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात या फाउंडेशनच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाणी फाउंडेशनचे पुरंदर तालुका समन्वयक सुरेश सस्ते यांनी फाउंडेशनच्या कामाची तसेच फाउंडेशनकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धेची विस्तृत माहिती दिली. फाउंडेशनच्या वतीने या वर्षी राज्यातून १३ जिल्ह्यांतील ३० तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातून पुरंदर आणि इंदापूर तालुक्याची निवड केली आहे. यात लोकसहभाग महत्त्वाचा असून, शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळणार आहे. पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी ही ग्रामविस्तार अधिकारी व ग्रामसेवकांनी आपापल्या ग्रामपंचायत स्तरावर या उपक्रम व स्पर्धेविषयी ग्रामस्थांना माहिती द्यावी व ग्रामपंचायतींचा सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे.