शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

पुरंदर, भोरला पावसाने झोडपले

By admin | Updated: September 14, 2015 04:34 IST

परतलेल्या पावसाने आज पुरंदरचा पश्चिम भाग व भोर तालुक्यात दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलसा मिळाला

पुणे : परतलेल्या पावसाने आज पुरंदरचा पश्चिम भाग व भोर तालुक्यात दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलसा मिळाला. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी शिंदेवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेच्या आठवणी या पावसाने पुन्हा ताज्या झाल्या. पाणी साचल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.आज पडलेल्या पावसाने गेल्या तीन महिन्यांतील तूट भरून निघेल, अशी आशा निर्माण झाली आहे. भोर तालुक्यात पुणे-सातारा महामार्गावरील वेळू, शिंदेवाडी, ससेवाडी, गोगलवाडी परिसरात वादळीवाऱ्यासह सुमारे ३ तास पाऊस झाला. वेळू, शिंदेवाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. पुरंदर तालुक्यात सासवड शहरासह पश्चिम भागाला चांगलेच झोडपून काढले. शहरातील रस्त्यांना ओढ्या - नाल्याचे स्वरूप आले होते. पश्चिम पुरंदर परिसरात चांबळी , बोपगाव, हिवरे परिसरात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. जवळपास सर्व बंधारे तुडूंब भरून वाहू लागले. तर चांबळीच्या चरणावती नदीला सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाणी आले. श्रीनाथवाडी येथील १५ ते २० घरात पाणी शिरल्याने येथील नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. हिवरे परिसरात सर्वच बंधारे भरून वाहू लागले होते. (प्रतिनिधी)