शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:10 IST

पुणे : उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाद्वारे पुण्याचे नाव देशासह जगभरात पोहोचविणारे भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ...

पुणे : उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाद्वारे पुण्याचे नाव देशासह जगभरात पोहोचविणारे भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब नीळकंठ कल्याणी यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला आहे.

डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांना हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. कोविड-१९ चे संकट कमी झाल्यानंतर एका खास समारंभात हा पुरस्कार सोहळा होईल. त्याच वेळी स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवर लढताना जखमी झालेल्या काही जवानांनाही गौरवणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी मंगळवारी (दि.२३) सांगितले.

बाबा कल्याणी यांच्या नावाची निवड ही गेल्या वर्षीच केली होती, पण कोविड-१९च्या वाढत्या संकटामुळे गेल्या वर्षी हा पुरस्कार जाहीर केला नाही. पुरस्काराचे यंदाचे ३२ वे वर्ष असून, स्मृतिचिन्ह आणि १ लाख रूपये असे पुण्यभूषण पुरस्काराचे स्वरूप आहे. बाबासाहेब नीळकंठ कल्याणी हे एकूण ३.० बिलीयन डॉलर्सची उलाढाल असणाऱ्या कल्याणी ग्रुप या अग्रगण्य कंपनी असलेल्या भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.

यावेळी धरमवीर सिंग (नाईक), सुरेश कुमार कर्की (नाईक), के. नागी रेड्डी ( शिपाई), हौसाबाई पाटील (सातारा) आणि माधवराव माने (सांगली) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.