शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीअभावी ठेकेदारांकडून पुणेकर वेठीस

By admin | Updated: January 6, 2017 07:11 IST

रस्त्यावर बंद पडलेल्या बस तातडीने दुरुस्त करणे, बस रस्त्यावरून हटविण्याची पुरेशी यंत्रणाच ठेकेदारांकडे नाही. परिणामी बंद बसेस तासन् तास रस्त्यातच उभ्या राहत

पुणे : रस्त्यावर बंद पडलेल्या बस तातडीने दुरुस्त करणे, बस रस्त्यावरून हटविण्याची पुरेशी यंत्रणाच ठेकेदारांकडे नाही. परिणामी बंद बसेस तासन् तास रस्त्यातच उभ्या राहत असल्याने वाहनचालकांना सातत्याने वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत पुणे महानगर परिवहन महामंडळाकडूनही (पीएमपी) ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे.पीएमपीने पाच ठेकेदारांमार्फत सुमारे ६५३ बस भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. तर पीएमपीच्या ताफ्यात सुमारे १२०० बस असून, त्यापैकी ६५० ते ७०० बस प्रत्यक्ष मार्गावर धावतात. पीएमपी व ठेकेदारांच्या बसेस रस्त्यातच बंद पडण्याचे प्रमाण मोठे आहे. पुणे शहरासह पिंपरी चिंचवड व लगतच्या भागात बस बंद पडतात. शहराच्या मध्यवस्तीत बस बंद पडल्यानंतर काही मिनिटांत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होते. पीएमपीच्या आकडेवारीनुसार, दर तासाला सुमारे १२ बस बंद पडतात. याचा अर्थ दिवसभरात किमान २०० बस रस्त्यातच बंद पडत असल्याची गंभीर स्थिती आहे. मात्र, या बस दुरुस्त करणे किंवा रस्त्यावरून वर्कशॉपमध्ये घेऊन जाण्याची पुरेशी यंत्रणा नाही. शहरातील पेठांमधील अरुंद मार्ग, मुख्य रस्त्यांवरही अनेकदा बस बंद पडतात. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या बस तासन् तास रस्त्यात उभ्या असतात. बंद बस वर्कशॉपमध्ये नेण्यासाठी किंवा जागेवर दुरुस्त करण्यासाठी पीएमपीकडे एकूण १७ व्हॅन आहेत. तर ठेकेदारांकडे प्रत्येकी एकच व्हॅन आहे. पीएमपीतील व्हॅनद्वारे केवळ मालकीच्या बसेसच ओढून नेल्या जातात तर ठेकेदारांकडून त्यांच्या बसेससाठी व्हॅन वापरल्या जातात. मात्र, बंद बसेसचे प्रमाण आणि ठेकेदारांकडे उपलब्ध व्हॅनची संख्या यामध्ये खूप मोठी तफावत आहे. त्यामुळे ठेकेदारांकडील बस रस्त्यात बंद पडल्यानंतर ती ओढून नेण्यासाठी खूप वेळ लागतो. बराच काळ बस रस्त्यात उभ्या राहिल्याने वाहतूककोंडी होत असल्याच्या कारणास्तव वाहतूक पोलिसांनी पीएमपी प्रशासनालाही वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्यापही या यंत्रणेत सुधारणा झालेली नाही.