पुणे : रोजच्या घरच्या पोळी-भाजीला कंटाळून बाहेर हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी वेगळे खायचे म्हणले की पंजाबी डिशमधील विविध प्रकारच्या पनीरच्या भाज्या, रोटी, रूमाली रोटी, कुलचा, बटर नान असा मेनू सांगूनच आॅर्डर दिली जाते. पण आता गृहिणींसाठी आणि खवय्यांसाठी हे सर्व पंजाबी डिशचे पदार्थ घरच्या घरीच तयार करून खायला मिळणार आहेत. लोकमत सखी मंच आणि चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स् प्रा.लि. यांच्या वतीने महिलांसाठी पंजाबी स्पेशल रेसिपीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजता ही कार्यशाळा वडगाव शेरी येथे भरविण्यात येणार आहे. यामध्ये मेथी पनीर मटर मलाई, व्हेजिटेबल माखनवाला, दम आलू, कॉर्न कॅप्सीकम चीज करी, पनीर लाजवाब, पंजाबी छोले-कुलचा, दाल मखनी, दाल तडका, व्हेज बिर्याणी, तवा पुलाव, पाईनापॅल रायता, रोटी, लच्छा पराठा, नान, रूमाली रोटी या विविध रेसीपींचे मार्गदर्शन शोभा इंदाणी क रणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क लोकमत कार्यालय (०२०-६६८४८५८६)(प्रतिनिधी)
सखींसाठी पंजाबी तडका
By admin | Updated: January 24, 2015 00:00 IST