शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या ऋतुजाला दुहेरी मुकुटाची संधी

By admin | Updated: June 10, 2017 02:18 IST

आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेने सुरू असलेल्या १५ हजार डॉलर खुल्या महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत ऋतुजा भोसले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेने सुरू असलेल्या १५ हजार डॉलर खुल्या महिला आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत ऋतुजा भोसले, महक जैन या भारतीय खेळाडूंनी शनिवारी आपल्याच देशातील खेळाडूंचे आव्हान संपवून खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीतही अंतिम फेरी गाठली असल्याने पुण्याच्या ऋतुजाला दुहेरी मुकुट पटकावण्याची संधी आहे. औरंगाबादेतील गारखेडा येथील डिव्हीजनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या टेनिस कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. एकेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या पुण्याच्या ऋतुजाने रम्या नटराजनचा टायब्रेकमध्ये ६-३, ७-६ (६) असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. १ तास २८ मिनिटे चाललेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये ऋतुजाने वर्चस्व राखत ५-१ अशी आघाडी घेतली त्यानंतर रम्याने फोरहँडचे फटके लावत सलग दोन गेम जिंकल्या. पण ऋतुजाने सर्व्हिस राखत हा सेट ६-३ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये ऋतुजाने वरचढ खेळ करत सामन्यात ३-० अशी आघाडी घेतली. मात्र, रम्याने कमबॅक करत ३-३ अशी बरोबरी साधली. त्यानंतर ऋतूजाने आक्रमक खेळ करत सातव्या व नवव्या गेममध्ये रम्याची सर्व्हिस रोखली व सामन्यात ६-५ अशी स्थिती निर्माण झाली. रम्याने ऋतुजाची १० व १२व्या गेममधे सर्व्हिस भेदली. त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये६-५ अशी स्थिती असताना ऋतुजाने तीन गुण मिळवत हा सेट ७-६ (६)ने जिंकून अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत १६ वर्षीय महक जैनने पाचव्या मानांकित निधी चिलुमुलाचा ६-४, ६-३ असा पराभव करून दिमाखात अंतिम फेरी गाठली. १ तास २१ मिनिटे चाललेल्या या सामन्यात महक हिने चतुराईने खेळ करत १०व्या गेममध्ये निधीची सर्व्हिस रोखली व हा सेट ६-४ने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये महकने बेसलाईनवरून सतत रॅली करत दुसऱ्या व सहाव्या गेममध्ये निधीची सर्व्हिस भेदली व हा सेट ६-३ असा जिंकून विजय मिळवला. दुहेरीत उपांत्य फेरीत ऋतूजा भोसलेने कणिका वैद्यच्या साथीत मनिषा फोस्टर व अ‍ॅलेक्झँड्रा वॉल्टर्स यांचा ६-१, ६-३ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रांजला येडलापल्ली व जिओक्सी झाओ या जोडीने स्नेहादेवी रेड्डी व रिशीका सुंकारा यांचा ७-५, ६-३ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.