शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या नीरज आनंद याचा खळबळजनक निकाल;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोलारीस क्लबतर्फे आयोजित तिसऱ्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या ३५ वर्षांखालील गटात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सोलारीस क्लबतर्फे आयोजित तिसऱ्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या ३५ वर्षांखालील गटात पुण्याच्या नीरज आनंदने अग्रमानांकित रवींद्र पांड्ये याचा पराभव करून खळबळजनक निकाल नोंदविला. धवल पटेल, राजेश दवे, राहुल शर्मा या खेळाडूंनी आपापल्या गटात प्रतिस्पर्धी खेळाडूंवर संघर्षपूर्ण विजय नोंदवित आगेकूच केली.

सोलारीस क्लब आणि डेक्कन जिमखाना क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत ३५ वर्षांवरील गटाच्या पहिल्या फेरीतच सनसनाटी निकाल नोंद झाली. नीरज आनंद याने पुण्याच्याच आणि गतविजेत्या रवींद्र पांड्ये याचा ६-४, ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकालाची नोंद केली. सव्वा तास चाललेल्या सामन्यात आनंदने पांड्ये या अग्रमानांकित खेळाडूंपेक्षा वरचढ खेळ केला. बेसलाइनवरून खेळताना आनंदने ताकदवान क्रॉस शॉटस्चे अचूक प्रदर्शन केले. त्याच्या या वेगवान खेळापुढे पांड्येचा निभाव लागला नाही.

३५ वर्षांखालील गटात नवेंद्रसिंग चौहान याने नीतेश रूंगठा याचा ६-१, ६-० असा तर ज्ञानेश्‍वर पाडाळे याने रोहित माने याचा ६-१, ६-२ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. ४५ वर्षांवरील गटामध्ये राष्ट्रीय खेळाडू व गतविजेता नितीन कीर्तने याने राहुल सिंगचा ६-०, ६-० असा सहज पराभव केला. अतितटीच्या सामन्यात राजशे दवे याने रामचंद्र व्ही. याचा टायब्रेकरमध्ये ७-६(५), ६-३ असा पराभव केला. राजेश डिसुझा, राहुल शर्मा, सुनील लुल्ला, नीलेश शहा, दिनेश कुमार, संजय डाब्रा आणि केतन बेडेकर यांनी विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.

७० वर्षांखालील गटात धवल पटेल याने हेमंत साठे याचा ३-६, ७-५, ७-६(५) असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. अजित पेंढारकर, धवल पटेल, श्रीकांत पारेख, गंगाधरन एस., ताहीर अली, रूमी प्रिंटर आणि पद्माली यांनीही प्रतिस्पर्धी खेळाडूवर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठली.