शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला पुणेरी पाटीचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 18:46 IST

पुणेरी पाटयांचा जगभर बोलबाला आहे, अशाच एका पुणेरी पाटीमधून भाजपाला चांगलाच झटका देण्यात आला आहे.

पुणे, दि. 6  : पुणेरी पाटयांचा जगभर बोलबाला आहे, अशाच एका पुणेरी पाटीमधून भाजपाला चांगलाच झटका देण्यात आला आहे. पुणेकर बंधु आणि भगिनींनो, आमचा कुणीही पदाधिकारी बावळट नाही असे फलक शहरात लावण्यात आले आहे. भाजपाचे खासदार संजय काकडे यांनी नुकतेच भाजपाच्या महापालिकेतील पदाधिकाºयांना जाहीररित्या बावळट म्हटले होते, यापार्श्वभुमीवर विरोधकांकडून पुणेरी फलकातून भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे.सोशल मिडीयावर संजय काकडे यांच्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. जादा दराने २४ तास समान पाणी पुरवठा योजनेच्या निविदांना महापालिकेकडून मंजूरी देण्यात आली. यामुळे महापालिकेचे कोटयावधी रूपयांचे नुकसान होणार असल्याने विरोधी पक्षांसह भाजपाच्या लोकप्रतिनिधींही या निविदांना आक्षेप घेतला होता. यापार्श्वभुमीवर २४ तास पाणी पुरवठा योजनांची निविदा प्रक्रियाच रदद् करण्यात आली. यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी ही निविदा प्रक्रिया रदद् करण्याचे आदेश दिल्याचे सांगून पालिकेतील आमचे पदाधिकारी बावळट असल्याचे जळजळीत टिका संजय काकडे यांनी केली होती.महापालिकेत भाजपाची सत्ता यावी म्हणून मोठा पुढाकार घेतलेल्या संजय काकडे यांनीच पालिकेतल्या पदाधिकाºयांना बावळट म्हटल्याने विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले आहे. निलायम टॉकिज व पेठेतील विविध चौकांमध्ये ह्यआमचे पदाधिकारी बावळट नाहीतह्ण असे फलक लावण्यात आले आहेत. अज्ञात व्यक्तींकडून हे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांची शहरात दिवसभर चर्चा रंगली होती. संजय काकडे यांच्या टिकेमुळे नाराज झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हे फलक लावले असावेत असाही अंदाज वर्तविण्यात येत आहेत.शहराच्या विविध मुददयांवर असे बोचरी टिप्पणी करणारे निनावी फलक लावण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात घडत आहेत. नोटाबंदी, महापौर व पालकमंत्र्यांचे परदेश दौरे याबाबतही अशाच पाटया शहरभर लावण्यात आल्या होत्या. काँग्रेस पक्षातील अंतर्गत हेव्यादाव्यांवरही फलक लावण्यात आले होते.