शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकर म्हणतात, हेल्मेटमुळे पडते टक्कल

By admin | Updated: February 7, 2016 04:05 IST

हेल्मेटसक्ती चुकीची आहे... हेल्मेट वापरल्यामुळे थोडीच अपघात कमी होणारेत... उलट हेल्मेटवापरामुळे डोक्यावरची केस कमी होतात, टक्कल पडते, आजू-बाजूचे ऐकू येत नाही.

पुणे : हेल्मेटसक्ती चुकीची आहे... हेल्मेट वापरल्यामुळे थोडीच अपघात कमी होणारेत... उलट हेल्मेटवापरामुळे डोक्यावरची केस कमी होतात, टक्कल पडते, आजू-बाजूचे ऐकू येत नाही... नीट दिसत नाही... मान, खांदे दुखतात... अशी विविध हास्यास्पद कारणे सध्या पुण्यात ठिकठिकाणी ऐकू येत आहेत. वाहतूक पोलिसांकडून शहरात हेल्मेटसक्ती करण्यात आल्याने आणि हेल्मेट न वापरणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू झाल्याने धास्तावलेल्या पुणेकरांकडून त्याला विरोध करण्यासाठी अशी तर्क नसलेली कारणे दिली जात आहेत.राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी पुण्यात हेल्मेटसक्ती करण्याचे आदेश देताच त्याची अंमलबजावणी शहर वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांकडून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. यामुळे पुणेकर धास्तावले आहेत. काही पुणेकरांकडून, संघटना आणि राजकीय पक्षांकडून या सक्तीला विरोध केला जात आहे. त्याविरोधात नागरिक रस्त्यावरही उतरू लागले आहेत. मात्र दुचाकी चालविताना हेल्मेट वापरणे किती गरजेचे आहे आणि त्यामुळे अपघात झाल्यास प्राण वाचू शकतात, याकडे हे विरोध करणारे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.अशा वेळी अनेक पुणेकर मला हेल्मेट वापरल्यामुळे मानदुखी होते, मला स्पाँडिलायसिसचा त्रास आहे, असे सांगताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर हेल्मेट वागवणे गैरसोईचे आहे, त्याची आवश्यकता नाही, हेल्मेट घातल्यामुळे डोक्याला घाम येतो आणि तो डोक्यात मुरून डोके दुखू लागते, मान वळवता येत नाही, शेजारून जाणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही, अशी विविध हास्यास्पद करणे देत आहेत. काही जण तर हेल्मेट नसल्यामुळे अपघातामध्ये मृत्यू होत नाहीत अशीही तर्कसंगत नसलेली कारणे देताना दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)पोलिसांकडून समजावण्याचा प्रयत्नदिवसभरात शहरात पोलिसांकडून हेल्मेट न वापरणाऱ्या ४ ते ५ हजार दुचाकीस्वारांकडून दंडाची आकारणी केली जात आहे. अचानक पोलिसांनी थांबविल्याने आणि लायसन्स असतानाही केवळ हेल्मेट नाही, म्हणून दंड आकारण्यावरून पोलीस आणि दुचाकीस्वारांमध्ये वादही होताना दिसून येत आहेत. काही वेळा पोलीस दुचाकीस्वारांना समजावण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. मात्र अनेकदा त्यांचे म्हणणे दुचाकीस्वार ऐकत नसल्याचे चित्र आहे.