शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

हॉस्पिटल माफियांकडून पुणेकरांची होतेय लूट

By admin | Updated: December 1, 2015 03:46 IST

महापालिकेने शहरातील अनेक हॉस्पिटलना जागा, जादा एफएसआय दिला; त्यानुसार त्या हॉस्पिटलनी पुणेकर नागरिकांवर मोफत तसेच सवलतीच्या दरात उपचार करणे आवश्यक

पुणे : महापालिकेने शहरातील अनेक हॉस्पिटलना जागा, जादा एफएसआय दिला; त्यानुसार त्या हॉस्पिटलनी पुणेकर नागरिकांवर मोफत तसेच सवलतीच्या दरात उपचार करणे आवश्यक असताना त्यांच्याकडून या सुविधा दिल्या जात नाही. हॉस्पिटल ही सेवा देणारी केंद्रे न राहता, चोर बनली आहेत. आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हे घडत असून असेच सुरू राहिले, तर लोक तुम्हाला रस्त्यावर खेचल्याशिवाय राहणार नाहीत, अशी जोरदार टीका नगरसेवकांनी सोमवारी मुख्य सभेत केली. महापालिकेच्या मुख्य सभेत अविनाश बागवे यांनी रुबी हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल (कर्वे रस्ता, बोपोडी), एम्स हॉस्पिटल औंध यांच्याकडून रुग्णांवर सवलतीच्या दरात उपचार केले जात नसल्याचा विषय उपस्थित केला. याचा तीव्र शब्दांत निषेध करून सभागृह नेते बंडू केमसे, रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे, सुभाष जगताप, बापू कर्णे, नगसेविका संगीता तिकोणे, नगरसेवक धनंजय जाधव, सतीश म्हस्के, सचिन भगत, योगेश मुळीक, राजा लायगुडे, प्रशांत जगताप, चेतन तुपे, बंडू गायकवाड, अभय छाजेड, सिद्धार्थ धेंडे, प्रिया गदादे यांनी जोरदार टीका केली.बंडू केमसे म्हणाले, ‘‘हॉस्पिटल चोर असून पुणेकर नागरिकांना लुटत आहेत. औषधे नाहीत म्हणून पुणेकर नागरिक जीव सोडतात. राजीव गांधी हॉस्पिटलमधील दोन मजले बंद असून, तिथे फक्त दहा बेड सुरू आहे. हॉस्पिटलसोबत अधिकाऱ्यांचे संगनमत असल्यानेच हे घडत आहे. एक दिवस पुणेकर नागरिक तुम्हाला रस्त्यावर खेचतील.’’प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘हॉस्पिटलकडे गरीब रुग्णांना सवलत देण्याची क्षमायाचना आम्ही अनेकदा करतो; मात्र ते प्रतिसाद देत नाहीत. हॉस्पिटल माफियांना ताळ्यावर आणण्याची गरज आहे.’’ सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले, ‘‘महापालिका आरोग्यासाठी मोठा खर्च करते. त्यातील निम्म्यापेक्षा जास्त खर्च हा नगरसेवक, अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांकरिता होतो. गरजूपर्यंत या सुविधा खूपच कमी पोचतात.’’ हॉस्पिटलच्या या योजनांची आरोग्य विभागाने व्यापक प्रसिद्धी केलेली नसल्यामुळे त्याची माहिती नागरिकांना मिळत नाही. ही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सुभाष जगताप यांनी केली. पूना हॉस्पिटलने महापालिकेकडून घेतलेल्या जागेचा वापर पार्किंगसाठी केला आहे, करारानुसार तसे करता येत नसल्याचे धनंजय जाधव यांनी सांगितले. शहराची हेल्थ पॉलिसी ठरविणार- जादा एफएसआय घेतलेल्या हॉस्पिटलनी करारानुसार नागरिकांवर उपचार करावेत, याकरिता सर्व हॉस्पिटल चालकांची आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घेतली जाईल. प्रत्येक प्रभागामध्ये महापालिकेची ओपीडी व विभागवार हॉस्पिटल सुरू केले जाईल. त्याचबरोबर शहराची हेल्थ पॉलिसी तयार केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले. शहरी गरीब रुग्णांसाठी वेगळे दर लावले जात असतील, तर त्यांची चौकशी केली जाईल. तसेच, रेसिडेन्ट मेडिकल डॉक्टरांनी हॉस्पिटलजवळच राहिले पाहिजे याच्या सूचना दिल्या जातील, असे जगताप यांनी स्पष्ट केले.हॉस्पिटलवर आरोप- या हॉस्पिटलनी पुणेकर नागरिकांवर मोफत तसेच सवलतीच्या दरात उपचार करणे आवश्यक असताना त्यांच्याकडून या सुविधा दिल्या जात नाही. हॉस्पिटल ही सेवा देणारी केंद्रे न राहता, चोर बनली आहेत. हॉस्पिटलसोबत अधिकाऱ्यांचे संगनमत असल्यानेच हे घडत आहे.