शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनी गृहप्रदर्शनाला दिला भरघोस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:10 IST

लोकमत आयोजित अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घर खरेदीचे स्वप्न साकारण्यासाठी ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१८’ या गृहप्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

पुणे : लोकमत आयोजित अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घर खरेदीचे स्वप्न साकारण्यासाठी ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१८’ या गृहप्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला पुण्यातील विविध भागांतील नागरिकांनी व पुण्याबाहेरील, मात्र पुण्यात आपलं घर घेऊ इच्छिणाऱ्या असंख्य नागरिकांनी आवर्जून हजेरी लावली. अक्षय सुखाचे संचित हे स्वप्न साकारण्यासाठी अनेक विविध गृह पर्यायांचा बारकाईने अभ्यास केला.या प्रदर्शनात अनेक नामांकित गृहप्रकल्प प्रदर्शित झाले होते. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील वन बीएचकेपासून ते बंगलो प्लॉट्सपर्यंतचे विविध पर्याय, नागरिकांना या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकाच छताखाली पाहता आले.ज्येष्ठ नागरिकांपासून ते पुण्याला नवी ओळख देणाºया आयटी क्षेत्रातील अनेक नागरिकांनी आपल्याला हवे असलेले, आपल्या मनासारखे व सर्वांत महत्त्वाचे आपल्या बजेटमधील घर पाहायला मिळेल, या उद्देशाने या प्रदर्शनाला हजेरी लावली. अक्षय तृतीयेनिमित्त बांधकाम व्यावसायिकांनी अनेक आकर्षक योजना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणल्या होत्या. त्यामध्ये अत्यल्प डाऊनपेमेंट, पझेशननंतर ईएमआय, मूळकिमतीवर सवलत, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणारी सूट व जीएसटी कराएवढी सूट अशा विविध योजनांचा यामध्ये सहभाग होता.रविवारी संध्याकाळी विशेषत: अनेक जण सहकुटुंब या प्रदर्शनालाभेट देऊन कुटुंबातील सर्वांना अनुरुप अशा घरांची निवड करताना दिसूनयेत होते. मध्यवर्ती ठिकाणी वआगामी सणांच्या मुहूर्तावर ‘लोकमत’ने हे गृहप्रदर्शन आयोजितकेल्याबद्दल अनेकांनी आयोजकांचे आभार मानले.>वास्तुशास्त्रातील वैज्ञानिक वास्तवाचे महत्त्वमकरंद सरदेशमुुख हे वास्तुशास्त्रातील तज्ज्ञ असून, वैज्ञानिक वास्तवाचे महत्त्व साध्या शब्दांत त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. घरातील अतिशय साध्या व सोप्या बदलातून रोजच्या जगण्यातला आनंद आपण मिळवू शकतो हे वास्तव जीवनातील अनेक घटनांतून समजावून सांगितले. यामुळे वास्तुशास्त्र व त्याबद्दलचे समज-गैरसमज दूर होण्यास मदत झाली. हे मार्गदर्शन सत्र रविवारी (दि. ८ एप्रिल) दुपारी ४ वाजता गणेश कला क्रीडा मंचाच्या आवारात झाल्याने स्वप्नातील घराबरोबर त्यातील महत्त्वपूर्ण अशा वास्तुशास्त्राच्या अनेक बाबींचा विचार एकाच ठिकाणी इच्छुक ग्राहकांना करता आला.>अक्षय तृतीयेच्यानिमित्ताने याच प्रदर्शनात सहभागी झालेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने ग्राहकांचे उत्पन्न विचारात घेऊन तत्त्वत: त्वरित गृहकर्ज मंजुरीपत्र दिल्याने अनेकांचा आनंद द्विगुणीत झाला.