शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांना नको हेल्मेटसक्ती

By admin | Updated: February 7, 2016 04:04 IST

पुणेकर हा सजग नागरिक असून पुण्यात हेल्मेटसक्तीची आवश्यकता नसल्याचे मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले. शासनाने हेल्मेटसक्ती करताना कायद्याबद्दल

पुणे : पुणेकर हा सजग नागरिक असून पुण्यात हेल्मेटसक्तीची आवश्यकता नसल्याचे मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले. शासनाने हेल्मेटसक्ती करताना कायद्याबद्दल जनतेच्या मनात तिरस्कार वाढवू नये, असेही ते म्हणाले. परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या घोषणेनंतर औरंगाबाद पाठोपाठ पुण्यामध्ये लागू करण्यात आलेल्या हेल्मेटसक्तीविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ शनिवारी सकाळी दहा वाजता करण्यात आलेल्या या आंदोलनाला महापौर दत्ता धनकवडे, आमदार मेधा कुलकर्णी, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी महापौर अंकुश काकडे, शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण, नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेविका रूपाली पाटील, नगरसेवक प्रशांत बधे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे आदी उपस्थित होते.तेंडुलकर म्हणाले, ‘‘पुण्यातील रस्ते अरुंद आहेत, तसेच शहरात वाहतूककोंडीचे प्रमाण अधिक असल्यामुळे दुचाकीचालकांना त्रास होतो. हेल्मेट न घातल्यामुळे जिवाला धोका होऊ शकतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र हेल्मेट न घालण्यामागील कारणे समजून घेतली पाहिजेत. हायवेवर जाताना पुणेकर हेल्मेट अवश्य वापरतात, ही बाब महत्त्वाची आहे. शहरामध्ये हेल्मेट घातल्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता असते.’’विरोध हेल्मेटला नाही सक्तीलापुणेकरांचा विरोध हेल्मेटला नसून सक्तीला आहे. कोणी हेल्मेट वापरायचे हा निर्णय ज्याच्या त्याच्यावर सोडायला हवा. अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण असे किती असते. हेल्मेटमुळे माणूस वाचत असेल तर सिगारेट, दारूमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कितीतरीपटींनी अधिक आहे. सध्याचे सत्ताधारी आणि तत्कालीन शासनाने सिगारेट, दारूवर बंदी का नाही घातली. उलट हेल्मेटसक्ती करून ठेवली आहे. - सूर्यकांत पाठक सचिव, ग्राहक पेठशिवसेनेची बांधिलकी जनतेशीहेल्मेटसक्तीचा आदेश जरी शिवसेनेचे नेते परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी घेतलेला असला तरी हा निर्णय शासनाचा आहे. उच्च न्यायालय आणि शासनाने हा निर्णय घेण्याआधी समाजाचे प्रबोधन करणे तसेच हेल्मेट वापराविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. पक्षप्रमुख यांनी आम्हाला सांगितले आहे, की शिवसेनेची बांधिलकी ही जनतेशी आहे, सत्तेशी नाही. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार व्हायला हवा.- विनायक निम्हण, शिवसेना शहरप्रमुखमोबाईल कारवाई करा; हेल्मेटसक्ती नकोपुण्यातील रस्ते अरुंद आहेत. दुचाकीस्वारांचे प्रमाण शहरात मोठे आहे. हेल्मेटमुळे वाहन चालवताना आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. शासनाला कारवाईच करायची असेल तर वाहन चालवताना मोबाईल वापरणाऱ्यांवर करावी. - दीपक मानकर, माजी उपमहापौर