शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुणेरी ‘आकांक्षे’पुढती बुद्धिबळ‘विश्व’ ठेंगणे

By admin | Updated: October 4, 2016 03:27 IST

युवा प्रतिभावान बुद्धिबळ खेळाडू आकांक्षा हगवणे हिने कारकिर्दीतील मोठे शिखर सर करतानाच पुण्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे

पुणे : युवा प्रतिभावान बुद्धिबळ खेळाडू आकांक्षा हगवणे हिने कारकिर्दीतील मोठे शिखर सर करतानाच पुण्याच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला आहे. रशियातील कान्ट-मॅन्सियस्क येथे सुरू असलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने सोमवारी १६ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. ११ फेऱ्यांच्या या स्पर्धेत आकांक्षाने ९ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. अखेरच्या फेरीत पोलंडच्या स्लिव्हिस्का अ‍ॅलिसा हिच्यावर निर्णायक विजय मिळवून तिने विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत तिला १२वे मानांकन होते.नुकत्याच २ मोठ्या स्पर्धा जिंकल्या असल्याने आकांक्षाचा आत्मविश्वास उंचावलेला होता. शिवाय, या स्पर्धेसाठी तिचा सरावही चांगला झाला होता. यामुळे ती जिंकेल, असा विश्वास होता. मुलीचे कारकिर्दीतील हे पहिले विश्वविजेतेपद आमच्यासाठी अर्थातच स्पेशल आहे.- वैशाली हगवणे, आकांक्षाची आई१६ वर्षीय आकांक्षाचे २ महिन्यांतील हे तिसरे मोठे विजेतेपद आहे. याआधी तिने श्रीलंकेत झालेल्या राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत १६ वर्षांखालील गटाचे विजेतेपद आपल्या नावे केले. यानंतर कोलकाता येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात ती अजिंक्य ठरली होती.या विजेतेपदाबरोबरच आकांक्षाने ‘इंटरनॅशनल वुमन मास्टर’चा किताब मिळविला. याआधीचा नॉर्म तिने २०१५मध्ये सोल (दक्षिण कोरिया) येथे झालेल्या स्पर्धेत मिळवला होता. या स्पर्धेत १४, १६ व १८ वर्षांखालील मुलांच्या तसेच मुलींच्या गटांतून खेळत असलेल्या एकूण १८ भारतीय खेळाडूंपैकी केवळ आकांक्षालाच सुवर्णपदक जिंकण्यात यश लाभले आहे.