शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची पाणीपट्टी तुलनेने कमी

By admin | Updated: February 6, 2016 01:52 IST

मुंबई व नागपूर वगळता इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहराची पाणीपट्टी कमी असल्याची आकडेवारी पुणे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

पुणे : मुंबई व नागपूर वगळता इतर शहरांच्या तुलनेत पुणे शहराची पाणीपट्टी कमी असल्याची आकडेवारी पुणे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, अमरावती या शहरांशी पुणे महापालिकेच्या पाणीपट्टीची तुलना केली आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरामध्ये २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी पाणीपट्टीमध्ये पुढील ५ वर्षांत ८७ टक्के त्यानंतर पुढील २५ वर्षे सलग ५ टक्के पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या पालिका प्रशासनाच्या प्रस्तावास गुरुवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याच्या निर्णयाला मनसे, काँग्रेस व शिवसेनेकडून विरोध होेत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने इतर शहरांशी पुण्याच्या पाणीपट्टीची तुलना करणारी आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये नागपूर व मुंबई वगळता इतर शहरांच्या तुलनेत पुण्याची पाणीपट्टी कमी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मुंबईमध्ये औद्योगिक व व्यापारी दर जास्त असल्याने तिथे घरगुती पाण्याच्या वापराचा दर कमी ठेवण्यात आल्याचेही यात म्हटले आहे.शहराला २४ तास पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन गंभीर आहे. ३ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी कर्जाच्या माध्यमातून पैसा उभारला जाणार आहे. त्याकरिता एशियन डेव्हलपमेंट बँकेचे पथकाने भेट देऊन पाहणी केली. त्यांनी या प्रकल्पाला कर्ज देण्यासाठी प्री-प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला सुरुवातही केली आहे. दरम्यान, कर्ज घेण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याकरिता लगेच राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेबरोबरच जायका आणि जागतिक बँकेकडूनही या प्रकल्पासाठी कर्ज मिळविण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून किती कर्ज मिळू शकेल, हे येत्या आठवडाभरात समजणार आहे. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा, याकरिता प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, त्याबद्दल नागरिकांनी साशंकता बाळगू नये.- कुणाल कुमार, आयुक्त, महापालिका