शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिली ९४५ कोटी देणगी?
2
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
3
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
4
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
5
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
6
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
7
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
8
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
9
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
10
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
11
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
12
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
13
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
15
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
16
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
17
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
18
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
19
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
20
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे

Pune Vidhan Sabha 2024 : शहरात वाढलेल्या टक्केवारीचा फटका कोणाला ?

By राजू हिंगे | Updated: November 21, 2024 09:37 IST

जिल्ह्यात चांगले मतदान; शहरात वाढला मतदानाचा टक्का

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा असे एकूण २१ मतदारसंघात बुधवारी उत्साहात मतदान झाले. त्यामध्ये सांयकाळी पाचपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मतदान इंदापूर मतदारसंघात (६४. ५० टक्के), तर सर्वात कमी पिंपरी (४२.७२ टक्के) मतदारसंघात झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जिल्ह्यात यंदा चांगले मतदान झाले. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला असून, याचा फटका कोणाला बसतो आणि फायदा काेणाला हाेताे, याची उत्सुकता लागली आहे.यंदाची विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट यांची महाविकास आघाडी आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट यांची महायुती यांच्यामध्ये झाली. लोकसभा निवडणुकीला पुणे शहरात मतदानाचा टक्का कमी होता. याउलट ग्रामीण भागात मतदान चांगले झाले होते. या विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारसंघात चांगले मतदान होऊन काही मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात लढत झाली आहे. काका आणि पुतण्यामधील या हायहोल्टेज लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामती मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का आहे तेवढाच राहिला आहे. पिंपरी-चिंचवडमधील भोसरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. पिंपरीमध्ये मात्र मतदानाचा टक्का कमीच आहे.पुणे शहरातील वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, कॅन्टोन्मेंट, कसबा या आठ मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढलेले मतदान कुणाच्या पथ्थावर पडणार यावर बरेच काही अवलंबून आहे. या वाढलेल्या टक्केवारीचा फटका कोणाला बसतो, याचीही उत्सुकता लागली आहे.मतदानाची टक्केवारीमतदारसंघ - २०१९ - २०२४ (मतदानाची आकडेवारी सायंकाळ ५ पर्यंतची)जुन्नर -  ६३ - ६२.१२आंबेगाव - ६८ - ६३.८७खेड - ६७ - ६१.५७शिरूर - ६७ - ५८.९०दौंड - ६८ - ६१.९२इंदापूर - ७५- ६४.५०बारामती - ६८ -  ६२.३१पुरंदर - ६४ -  ५२.०५भोर - ६२ -    ५८.१७मावळ - ७२ -   ६४.४४चिंचवड - ५३ -  ५०.०१पिंपरी - ५१ -  ४२.७२भोसरी - ५९ -    ५५.०८वडगाव शेरी - ४७ -  ५०.४६शिवाजीनगर - ४४ -   ४४.९५कोथरूड - ४८ - ४७.४२खडकवासला - ५१ -   ५१.५६पर्वती - ५० -    ४८.६५हडपसर - ४८ - ४५.०२कॅन्टोन्मेंट - ४३ - ४७. ८३कसबा - ५१ -    ५४.९१

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kasba-peth-acकसबा पेठkothrud-acकोथरुडbaramati-acबारामती