शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विद्यापीठाने बुडविला पालिकेचा ४२ कोटींचा कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2015 23:33 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परवानगी न घेता ११ इमारती बांधून त्यांचा ४२ कोटी ३३ लाख रुपयांचा मिळकत कर व बांधकाम शुल्क बुडविल्याचे महापालिकेने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने परवानगी न घेता ११ इमारती बांधून त्यांचा ४२ कोटी ३३ लाख रुपयांचा मिळकत कर व बांधकाम शुल्क बुडविल्याचे महापालिकेने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी बांधकाम विभागाने कुलसचिवांना नोटीस बजावली आहे. विद्यापीठाच्या आणखी १४ इमारतींची तपासणी होणे बाकी असून, विद्यापीठाने बुडवलेल्या रकमेत आणखी ४० ते ५० कोटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे विद्यापीठातील अनेक इमारतींचे बांधकाम करताना महापालिकेकडून रीतसर परवानगी घेण्यात आली, त्याकरिता आवश्यक बांधकाम शुल्क व मिळकत कर अनेक वर्षांपासून भरला गेला नसल्याचे सजग नागरिक मंचाने माहिती अधिकारांतर्गत मिळविलेल्या माहितीतून उजेडात आले. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांकडे या प्रकरणी तक्रार केली होती. मिळकत कर विभाग व बांधकाम विभाग यांनी त्यानुसार विद्यापीठातील इमारतींची तपासणी सुरू केली. विद्यापीठातील एकूण २५ इमारती बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याची तक्रार केली होती. त्यांपैकी आतापर्यंत १४ इमारतींची तपासणी झाली असून, त्यात विद्यापीठाने ४२ कोटी ३३ लाख रुपये बुडविल्याचे स्पष्ट झाले आहे. बांधकाम विभागाकडे विकसन शुल्क न भरता इमारती बांधण्यात आल्या. त्याकरिता त्यांनी दंडासह १४ कोटी ५८ लाख २५ हजार रुपये भरावेत, अशी नोटीस बांधकाम विभागाने कुलसचिवांना दिली आहे. विद्यापीठातील बेकायदेशीरपणे बांधलेल्या काही इमारती १५ वर्षांपूर्वीच्या आहेत. इतके दिवस महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब कशी आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)कोणतीही सवलत लागू नाहीएमआरटीपी अ‍ॅक्ट १९६६च्या कलम ४४ नुसार बांधकाम करण्यापूर्वी नियोजन प्राधिकरणाची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. विद्यापीठ ही सांविधानिक संस्था असून, त्यांच्यावर राज्य शासनाचे नियंत्रण नसल्याने एमआरटीपी अ‍ॅक्ट १९६६ कलम १२४ एफ (१) अन्वये कोणतीही सवलत विद्यापीठास लागू नाही, असा अभिप्राय उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ज. ए. पाटील यांनी विधी विभागाला दिला आहे. त्यामुळे दंडासह रक्कम भरावी लागेल.