शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पुणेकरांमध्ये वाहतूक निरक्षरताच

By admin | Updated: October 6, 2016 03:58 IST

शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली असून

पुणे : शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली असून, पुणेकरांमध्ये अद्यापही वाहतूक निरक्षरता मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहतूक नियमभंगाच्या पावत्या फाडण्याचा विक्रम पुणेकरांनी यंदाही कायम ठेवला असून, गेल्या १० महिन्यांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या ९ लाख ६९ हजार कारवायांमध्ये तब्बल ११ कोटी ६० लाख ३५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असलेले पुणे शहर राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत वाहतूक नियमभंगामध्येही अग्रेसर असल्याचे दिसून येते. त्यामुळे ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असे अभिमानाने सांगणाऱ्या पुणेकरांकडून वाहतूक नियमभंगासाठी डिसेंबरअखेरपर्यंत १० कोटींचा दंड वसूल होण्याची शक्यता आहे.वाहतूक पोलिसांनी गुरुवारी १०० किलोमीटरची मानवी साखळी, पथनाट्ये यांद्वारे जनजागृती करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. लोकसहभागामधून वाहतुकीचे साधेसाधे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे. वर्षभर विविध मोहिमा, उपक्रम आणि जनजागृतिपर कार्यक्रमांच्या माध्यमातून वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते. परंतु, वाहतूक नियमभंग करणाऱ्यांच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढच होत चालल्याचे एकंदरीत चित्र आहे. किरकोळ स्वरूपाचे वाहतुकीचे नियमही पाळण्यात वाहनचालकांची मोठी उदासीनता कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एरवी टाळता येण्याजोग्या सिग्नल तोडणे, नो एंट्रीमध्ये वाहन घालणे, नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन लावणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, मोबाईलवर बोलणे, काळ्या काचा लावणे, कागदपत्रे जवळ न बाळगणे, विरुद्ध दिशेने येणे, पदपथावर वाहन लावणे अथवा चालविणे यासोबतच फॅन्सी नंबर प्लेट, लेन कटिंग, वाहनांना रिफ्लेक्टर न लावणे, रहदारीला अडथळा करणे अशा टाळता येण्याजोग्या चुका वाहनचालक करतात.किरकोळ स्वरूपाच्या वाटणाऱ्या चुका केवळ दंड भरण्यापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्यामुळे अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. रस्त्यावरून जाणाऱ्या वृद्ध व्यक्ती, गरोदर स्त्रियांच्या बाबतीतही ही संवेदनशीलता दिसत नाही. वेडीवाकडी वाहने चालविणे, मध्येच वाहन घालणे, रस्त्यावर वेडीवाकडी वाहने उभी करणे, दोन वाहनांमधून मार्ग काढत जाणे, लेनची शिस्त न पाळणे अशा अनेक कारणांमुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर, चिंचोळ्या आणि अरुंद रस्त्यांवरचे बेकायदा पार्किंग, व्यावसायिकांनी खाऊन टाकलेले इमारतींचे पार्किंग यामुळे रस्त्यांवरच्या अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे. (प्रतिनिधी)