शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

सौरऊर्जेने उजळणार पुणे स्टेशन

By admin | Published: December 09, 2015 12:26 AM

विजेची बचत करण्यासाठी देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जा पॅनल तसेच पवनचक्की उभारण्यात येणार आहे.

पुणे : विजेची बचत करण्यासाठी देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जा पॅनल तसेच पवनचक्की उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून निर्माण होणारी वीज वापरून रेल्वेकडून विजेवर होणाऱ्या खर्चाची बचत केली जाणार आहे. याबाबतचे आदेश केंद्रीय रेल्वे प्रशासनाने दिले असून त्यानुसार, पुणे रेल्वे स्थानक प्रशासनाकडून या कामाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.देशभरात विस्तारलेल्या रेल्वेचे १६ झोन असून ६६ विभाग आहेत, तर सुमारे साडेसात हजारांहून अधिक रेल्वे स्टेशन आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वीजवापर केला जातो. तसेच यासाठी डिझेल आणि कोळसा वापरला गेल्याने मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषणही होते. यामुळे वाढता वीजवापर कमी करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून सर्व प्रमुख जंक्शनच्या ठिकाणी सौरऊर्जा पॅनलचा वापरून त्या ठिकाणी निर्माण होणारी वीज स्टेशनसाठी वापरण्यात येणार आहे. पुणे स्टेशनवरही ही यंत्रणा उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी यंत्रणा उभारण्यासाठीची प्रशासकीय तयारी रेल्वे प्रशासनाने पूर्ण केली आहे. हे काम येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पुणे रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे स्थानक असून येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे येथे विजेचा वापर मोठ्या प्रमाणात आहे. आता सौरऊर्जेच्या वापरामुळे रेल्वे प्रशासनाच्या बिलात बचत होणार आहे. (प्रतिनिधी)