शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे 'स्मार्ट सिटी'चे पर्यावरण मंत्र्यांविरोधात ट्विट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:11 IST

पुणे : 'स्मार्ट सिटी'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी करणारे ट्विट केल्याचा प्रकार समोर ...

पुणे : 'स्मार्ट सिटी'च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी करणारे ट्विट केल्याचा प्रकार समोर आला आहे. एकदा नव्हे तर दोनदा हे ट्विट करण्यात आले. हा प्रकार स्मार्ट सिटीच्या सोशल मीडिया हँडल करण्याचे काम घेतलेल्या दिल्लीच्या कंपनीच्या कर्मचाऱ्याने केल्याचे समोर आले आहे. शिवसेनेने आक्रमक होत तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे ट्विटर अकाऊंट आणि सोशल मीडियाचे कंत्राट दिल्लीच्या 'कुटुंब एचआर' यांच्याकडे दिलेले आहे. आमदार नीलेश राणे यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान असलेले ट्विट दोन दिवसांपूर्वी केले होते. ''ज्याची सोसायटीचा वॉचमन व्हायची लायकी नाही. त्याला आमदार केल्यावर लोकांना त्रास भोगावाच लागतो. वरळीकर टीव्हीवर पेंग्विन बघितला, तरी शिव्या घालतायत म्हणून मतदान करताना विचार केला पाहिजे. नाहीतर असा मनस्ताप होतो.'' असे या ट्विटमध्ये नमूद केले होते.

स्मार्ट सिटीचे पुण्याचे काम पाहणाऱ्या सोशल मीडिया आयटी स्पेशलिस्टकडून सोशल मीडियावर कंपनीशी संबधित नसलेले हे राजकीय स्वरुपाचे ट्विट शेअर करण्यात आले. ही बाब शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आली. पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी पदाधिकाऱ्यांसह स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन हे ट्विट तत्काळ डिलीट करावे तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

स्मार्ट सिटीकडून संबंधीत महिला कर्मचाऱ्याला तत्काळ काढून टाकण्यात आले असून भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्याकडून अशा प्रकारची चूक झाल्यास कुटुंब एचआर कंपनीसोबत करण्यात आलेला करार रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासोबतच सोशल मीडियाचे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि स्मार्ट सिटी वेबसाईटचे कामकाज मुख्य अधिकारी अनिरुध्द शहापुरे यांचेकडे सोपविण्यात आले आहे.