शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रो पिंपरीपर्यंत नव्हे, निगडीपर्यंत हवी!

By admin | Updated: July 5, 2017 03:19 IST

केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पुणे मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. पुणे महामेट्रोच्या वतीने हे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट हा मार्ग प्रस्तावित असून, त्यास केंद्राची तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने करण्यात आली आहे.निगडी ते पिंपरी या मार्गाचा पहिल्या टप्प्यात विचार केला नाही. दुसऱ्या टप्प्यात तो वर्गीकृत केला आहे. वास्तविक निगडीपर्यंत मेट्रो नेण्यास राज्य मंत्रिमंडळाने २३ आॅक्टोबर २०१३ ला मंजुरी दिली आहे. परंतु, विकास आराखड्यामध्ये निगडीपर्यंतच्या मेट्रोचा समावेश झाला नाही. तसेच निगडीपर्यंत मेट्रो नेण्यासाठी केवळ मेट्रो लाईन टाकण्याची गरज आहे. हे काम हजार कोटी रुपयांमध्ये होऊ शकते. ही वाढीव किंमत पुणे मेट्रो प्रकल्पाच्या आठ टक्के आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो नेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. मुंबईत दहिसर ते अंधेरी दरम्यान मेट्रो मार्गाचा समावेश एमएमआरडीने अशाच पद्धतीने केंद्राची तत्त्वत: मंजुरी मिळाल्यानंतर केला आहे. त्याला राज्य शासनाने निधी पुरविला. त्याच धर्तीवर पुणे महानगर प्रदेश क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रयत्नातून पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्प राबवावा, अशी शहरातील नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे.पिंपरी-चिंचवड शहराचा समग्र वाहतुकीच्या सोयीचा विचार करता व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता पुणे मेट्रोच्या पहिल्याच टप्प्यात निगडी-पिंपरी व पिंपरी-स्वारगेट या प्रकल्पाची सुरुवात करावी. चिंचवड, आकुर्डी या भागात मोठ्या औद्योगिक कंपन्या, हॉस्पिटल, सरकारी कार्यालये शाळा-महाविद्यालये, तसेच पर्यटनाची ठिकाणे आहेतसार्वजनिक वाहतूक सक्षम हवीनिगडी हे पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार आहे. यामुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी या परिसरात नागरिकांचा जास्त राबता असतो. पीएमपीचा निगडीत मुख्य बस डेपो आहे. निगडी डेपोतून सुटणाऱ्या बस दीडशे टक्के गर्दीने खचाखच भरलेल्या असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने मेट्रोची आवश्यकता निगडीपर्यंत आहे. निगडी, प्राधिकरण, आकुर्डी आणि जवळपासच्या सहा लाख करदात्यांना पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचा काहीच फायदा होणार नाही.वाढीव खर्च वाचवाफोरमच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून, मुख्यमंत्री चर्चेसाठी सकारात्मक असल्याचे फोरमचे तुषार शिंदे यांनी सांगितले. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे सर्वेक्षण २००७मध्ये झाले होते. त्या वेळच्या मेट्रोच्या खर्चात आणि आजच्या मेट्रोच्या खर्चात जवळपास सातशे कोटींचा वाढीव फरक आहे. त्यामुळे मेट्रो निगडीपर्यंत पोहोचली नाही, तर आणखी वाढीव खर्च येणार आहे, असे फोरमचे राजीव भावसार म्हणाले.