शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात स्वाइन फ्लू बळींची संख्या २५ वर

By admin | Updated: March 30, 2017 03:04 IST

गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी एका ४५ वर्षीय व्यक्तीचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २५ वर पोहोचली आहे. शिरूर येथील रुग्णाला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या घशातील स्रावाचे नमुने २७ मार्चला तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्याच दिवशी स्वाइन फ्लूचे निदान झाले होते. त्या व्यक्तीला न्यूमोनियाचा त्रास होता. २८ मार्चला उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. शहरात जानेवारी महिन्यापासून १४२ रुग्णांची नोंद झाली असून, २५ रुग्णांचा मृत्यू झाला. ८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या स्वाइन फ्लूचे ३३ रुग्ण शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील १९ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे. वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव शहरात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुण्याला ‘हाय अलर्ट’चा इशाराही दिला आहे. नागरिकांनी किरकोळ ताप, सर्दीचा त्रास झाल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.