शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नगर रस्त्याची वाहतूककोंडी सुटेना

By admin | Updated: April 24, 2017 04:37 IST

पुणे-नगर रोडवरील वाहतूककोंडी रोजचीच झाली असून शिक्रापूर पाबळ चौक, चाकण चौकात होणारी वाहतूककोंडी सोडवताना

शिक्रापूर : पुणे-नगर रोडवरील वाहतूककोंडी रोजचीच झाली असून शिक्रापूर पाबळ चौक, चाकण चौकात होणारी वाहतूककोंडी सोडवताना पोलीस यंत्रणेची धावपळ होत आहे. गेली अनेक वर्षे ही वाहतूककोंडी सोडवण्यास अपयश येत आहे.शिक्रापूर, रांजणगाव, कोंढापुरी, कारेगाव, कोरेगाव, सणसवाडी, लोणीकंद, वाघोली या सुमारे ३० किमीच्या अंतरावर दिवसातून किमान १५ ते २० वेळा मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. अनेक भागात ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले. परंतु ते अनेक वेळा बंद असतात, तर रस्त्याच्या कडेला नागरिकांच्या अस्ताव्यस्त उभे केलेले वाहने व रस्त्याच्या कडेला किरकोळ विक्रेते व रात्रीच्या सुमारास उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत असून संबंधित यंत्रणेने यावर कार्यवाही करून थोडीफार वाहतूक सुरळीत होऊ शकते. मागील वर्षात काही कंपन्या व पोलीस यंत्रणा मिळून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वॉर्डनची नियुक्ती केली होती. ही यंत्रणादेखील अपुरी पडत आहे, तर राजकीय उदासीनतेत या भागाचे आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, विविध राजकीय पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून वाघोली ते शिक्रापूर या ठिकाणी होणारे ‘उड्डाणपूल’ केवळ कागदावरच राहिले आहे. दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून जात असतात. त्यातच अनेक अपघातदेखील होत असतात. वाढते औद्योगिकरण व नागरीकणामुळे पुणे-नगर रोडवरील वाहतूककोंडी कधी सुटणार, हा गंभीर प्रश्न हजारो नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे या रोडलगतच शिक्रापूर पोलीस ठाणे, कोरेगाव पोलीस चौकी, लोणीकंद पोलीस ठाणे, रांजणगाव पोलीस ठाणे असून येथील संबंधित अधिकारी व कर्मचारीवर्गाला दररोज होणारी डोळ््यासमोरील वाहतूककोंडी पाहण्याची वेळ येत असून, वाहतूककोंडी सोडवताना सर्वांचीच धावपळ होत आहे. (वार्ताहर)