शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नगर मार्गावरील कोंडी फुटणार

By admin | Updated: April 13, 2016 03:26 IST

वाघोली ते शिक्रापूरदरम्यान सहापदरी रस्त्यासाठी १५ कोटींचा तत्काळ निधी देतानाच या मार्गावरील वाहतूककोंडी कायमची सोडविण्यासाठी ५३३.२५ कोटींच्या वाघोली,

कोरेगाव भीमा : वाघोली ते शिक्रापूरदरम्यान सहापदरी रस्त्यासाठी १५ कोटींचा तत्काळ निधी देतानाच या मार्गावरील वाहतूककोंडी कायमची सोडविण्यासाठी ५३३.२५ कोटींच्या वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूर या तीन गावांमध्ये उड्डाणपुलांची निर्मिती करण्याच्या योजनेस हिरवा कंदील दाखविला. पुणे-नगर मार्ग केंद्र सरकारकडेही वर्ग करण्याचे संकेत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिले. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासंदर्भातील लक्षवेधी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी विधानभवनात मंगळवारी मांडली याला उत्तर देताना पाटील यांनी नियोजन सांगितले. २००५ मध्ये या मार्गाचे ‘बांधा वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर नूतनीकरण करण्यात आले. परंतु रस्ता तयार करताना अतिक्रमणावर कारवाईही झाली नाही; शिवाय सर्व्हिस रस्ताही नसल्याने काही वर्षांतच या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवू लागली. दरम्यान, या मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीचा कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर व रांजणगाव औद्योगिक क्षेत्रालाही फटका बसत असतानाच कामगारांचाही प्रवासामध्ये दररोज तीन ते चार तास जास्त वेळ खर्च होत होता. यासंदर्भात डेक्कन चेंबर्स आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज व अ‍ॅग्रीकल्चरनेही मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन व औद्योगिक कारखानदारांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरून अष्टविनायकातील रांजणगाव गणपती देवस्थानसह मराठवाडा व विदर्भात जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे.पुणे-नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पाचर्णे यांनी हा मार्ग सहापदरी करण्याबरोबरच उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात लक्षवेधी मांडत, सरकारचे लक्ष केंद्रित केले होते. पाचर्णे यांनी या रस्त्यासंदर्भातील असणारी वाहतूक व त्याप्रमाणात नसलेला रस्ता याचे चित्र मांडले. शासनाकडे वाघोली ते शिक्रापूर असा २६ किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याचा २२०० कोटींचा प्रस्ताव बांधकाम विभागाने दाखल केला होता; मात्र हा प्रस्ताव शासनाच्या पायाभूत समितीने फेटाळला. आता वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूर या तीनच गावांमध्ये तीन स्वतंत्र उड्डाणपूल करण्याचा ५३३.२५ कोटींचा प्रस्ताव तयार करून त्यास जिल्हा नियोजन मंडळाच्या मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येईल, असे सांगितले. पुणे-नगर मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल व सहापदरी रस्ता केला, तरच वाहतूककोंडी सुटेल, हे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर पाटील यांनी वाघोली ते शिक्रापूर या सहापदरी रस्त्यासाठी १५ कोटी निधी टाकण्यास मंजुरी दिली. वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूर येथे उड्डाणपुलाचे काम तातडीने हातात घेतानाच पुणे-नगर मार्ग केंद्र सरकारकडे वर्ग करण्यासंदर्भात पुढच्या वर्षी शिफारस करण्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)