शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
2
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
3
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
6
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
7
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
8
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
9
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
10
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
11
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
12
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
13
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
14
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
15
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
16
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
17
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
18
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
19
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाचे कामकाज होणार ‘पेपरलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 17:15 IST

कामात सुसूत्रता येणार आहे. भ्रष्टाचारालाही पायाबंद बसण्यास मदत मिळणार

ठळक मुद्देआवक-जावक आता ऑनलाईन : फाईलींचा प्रवासही होणार ऑनलाईन

पुणे : टेबलावरील कागदपत्र आणि फाईलींचे ढीग कमी करुन कामामध्ये सुसूत्रता आणि सलगता आणण्याकरिता पालिकेची कार्यालये  ‘पेपरलेस’ केली जाणार आहेत. याची सुरुवात विद्यूत विभागापासून करण्यात आली असून या विभागाच्या आवक-जावक आणि कार्यालयीन कागदपत्र आता ऑनलाईन तपासून ऑनलाईनच ‘क्लिअर’ केली जात आहेत. त्यावरील आवश्यक स्वाक्षरीही अधिकारी मोबाईल अथवा संगणकावरुन व्हर्चुअली करीत आहेत. यापुढे फायलींचा प्रवासही ऑनलाईनच होणार असल्याचे विद्यूतचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांनी सांगितले.

पालिकेच्या संकेतस्थळाच्या डोमेनमध्ये विविध विभागांचे स्वतंत्र आयपी तयार करण्यात आलेले आहेत. विद्यूत विभागाला स्वतंत्र लॉग-इन देण्यात आलेले आहे. विद्यूत विभागाकडे येणारी पत्रे, टपाल आदी कागदपत्रे स्कॅन करुन या आयपीवर टाकले जातात. ही कागदपत्रे वरिष्ठ अधिका-यांकडे  फॉरवर्ड होतात. आवश्यक असलेल्या कागदपत्रांची मान्यता, स्वाक्षरी या ऑनलाईन पद्धतीनेच केल्या जात आहेत. अधिकारी कार्यालयातील संगणकावर अथवा मोबाईलवरही लॉग-ईन करुन काम करु शकणार आहेत.

कार्यालयीन कामकाजाच्या तसेच ठेकेदार, बिले आदींच्या फाईल्सही ऑनलाईन आणल्या जाणार आहेत. फायलींचा प्रवास कोणत्या टेबलवरुन कुठे होतो आहे?, कोणत्या टेबलावर संबंधित फाईल किती दिवस पडून आहे याचीही माहिती समजणार आहे. त्यामुळे कामात सुसूत्रता येणार आहे. भ्रष्टाचारालाही पायाबंद बसण्यास मदत मिळणार आहे.===पालिकेच्या विद्यूत विभागाचे काम  ‘पेपरलेस’ करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तुर्तास आवक-जावक आणि कागदपत्रांसंबंधी काम ऑनलाईन केले जात आहे. पर्यावरणपूरक व भ्रष्टाचाराला पायाबंद घालण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होईल. फायलींबाबतची ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पालिकेचे सर्व विभाग हळूहळू पेपरलेस करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्यूत विभाग

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdigitalडिजिटल