शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

वेळेवर माहिती न दिल्याने पुणे महापालिकेला फटका; आरोग्य विभागाने दिली ४५ हजार कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 12:26 IST

महापालिकेकडे माहिती अधिकारांतर्गत मागण्यात आलेली माहिती वेळेवर न दिल्याने पालिकेला लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देमहापालिकेच्या अनेक विभागांकडून उपलब्ध करून दिली जात नाही वेळेवर माहिती माहिती अधिकारांतर्गत अर्ज केल्यानंतर महिन्याच्या आत माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक

पुणे : महापालिकेकडे माहिती अधिकारांतर्गत मागण्यात आलेली माहिती वेळेवर न दिल्याने पालिकेला लाखो रुपयांचा फटका सहन करावा लागत आहे. माहिती अधिकारांतर्गत अर्जदार अपिलात जाऊन माहिती मिळवत असल्याने त्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रे त्यांना मोफत उपलब्ध करून द्यावी लागत आहेत. नुकतेच आरोग्य विभागाने वेळेवर माहिती न दिल्याने त्यांना तब्बल ४५ हजार कागदपत्रे एका अर्जदाराला अपिलात मोफत देण्याच्या खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागला आहे.शासकीय कार्यालयांकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज केल्यानंतर एक महिन्याच्या आत संबंधित माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. यावेळी अर्जदाराला त्या कागदपत्रांच्या फोटोकॉपीसाठी लागणारा खर्च जमा करावा लागतो. मात्र एक महिन्यात माहिती न मिळाल्यास तो त्याविरोधात अपील दाखल करू शकतो. अपील दाखल झाल्यानंतर मात्र मागितलेली सर्व माहिती अर्जदाराला मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या अनेक विभागांकडून वेळेवर माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याने त्याविरोधात अपील दाखल केले जात आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळेवर माहिती न दिल्याने त्यांना ४५ हजार कागदपत्रे मोफत उपलब्ध करून देण्याचा फटका सहन करावा लागला आहे.आरोग्य विभागाने २००९ ते २०१७ या कालावधीमध्ये केलेल्या औषध खरेदीच्या टेंडर प्रक्रिया, खरेदी, त्याची बिले, अदा केलेली रक्कम या संदर्भातील कागदपत्रे भरत सुराणा यांनी जून २०१७ मध्ये माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. आरोग्य विभागाने एक महिन्याच्या कालावधीमध्ये ही माहिती उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे सुराणा यांनी याविरोधात जुलै २०१७ मध्ये अपील दाखल केले. अपिलामध्ये सुराणा यांना सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश अपिलीय अधिकारी अंजली साबणे यांनी दिले. मात्र, त्यानंतरही माहिती देण्यात आली नाही. अखेर सुराणा यांना २० डिसेंबरच्या आत माहिती उपलब्ध करून न दिल्यास याला जबाबदार असणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई केली जाईल, असे पत्र अंजली साबणे यांनी काढले. त्यानंतर मात्र वेगाने सूत्रे हलली. एकही रुपया न खर्च करता सुराणा यांना २० डिसेंबरला ४५ हजार कागदपत्रे उपलब्ध झाली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही हीच माहिती वेळेवर उपलब्ध करून दिली असती तर सुराणा यांना ९० हजार रुपये या कागदपत्रांसाठी पालिकेकडे जमा करावे लागले असते. मात्र निष्काळजीपणामुळे पालिकेलाच भुर्दंड उचलावा लागला.

...पण मागितलेली मूळ माहितीच दिली नाहीमहापालिकेच्या आरोग्य विभागाकडे २००९ ते २०१७ दरम्यानच्या औषधखरेदी संदर्भातील सर्व कागदपत्रे जून महिन्यात मागितली होती. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर डिसेंबर महिन्यात याबाबतची ४५ हजार कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मात्र औषधे खरेदीसाठी पुरवठा ठेकेदारांना दिलेल्या लेखी आॅर्डरची प्रत, टेंडर प्रक्रियेची माहिती, अंतिम बिलांच्या प्रती पालिकेकडून मिळालेल्या नाहीत. याविरोधात राज्य आयोगाकडे अपील करणार आहे.    -भरत सुराणा, माहिती अधिकार कार्यकर्ते

संबंधितांकडून खर्च वसूल करावामाहिती अधिकारांतर्गत आलेले अर्ज अनेक अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे अर्जदारांना अपिलात जाऊन माहिती मिळवावी लागते. अपिलात अधिकाऱ्यांना शासकीय खर्चाने कागदपत्रांच्या प्रती उपलब्ध करून द्याव्या लागतात. महापालिकेत आरोग्य विभागाला ४५ हजार कागदपत्रे मोफत उपलब्ध करून द्यावी लागली. त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात यावा.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

राज्य आयोगाकडून रखडल्या अपिलाच्या सुनावणीशासकीय कार्यालयांमध्ये अनेकदा विविध प्रकारची कारणे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याविरोधात पहिले अपील तिथल्याच कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करावे लागते. बहुतांश हा अधिकारी माहिती नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत नाही. त्यानंतर राज्य माहिती आयोगाकडे दाद मागण्याचा पर्याय अर्जदाराकडे उपलब्ध असतो. मात्र राज्य माहिती आयोगाकडे हजारो अपिलाची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांच्याकडून अपिलाची सुनावणी रखडल्याने माहिती मिळण्यास खूपच विलंब होत आहे.

अबब!.. शिक्के मारण्यासाठी लागले दोन दिवसअपिलात माहिती उपलब्ध करून देण्याचे आदेश देऊनही माहिती देण्यात आली नाही. अखेर अर्जदाराला २० डिसेंबरपर्यंत कागदपत्रे न दिल्यास संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर दिवसरात्र एक करून ४५ हजार कागदपत्रांच्या फोटोकॉपी काढण्यात आल्या. या कागदपत्रांवर शिक्के मारण्यासाठी तब्बल दोन दिवस लागले. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाVivek Velankarविवेक वेलणकर