शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

खडकवासला धरण पुनरुज्जीवनाचे पुणे मॉडेल

By admin | Updated: July 6, 2015 05:50 IST

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचे पुनरुज्जीवन करण्याची लोकचळवळ ग्रीन थंब व श्रीमंत दगडू हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या पुढाकाराने सुरू आहे.

हणमंत पाटील, पुणेशहरातील पाणीपुरवठ्याचा तुटवडा संपविण्यासाठी नवीन धरण बांधणे अशक्य आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचे पुनरुज्जीवन करण्याची लोकचळवळ ग्रीन थंब व श्रीमंत दगडू हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या पुढाकाराने सुरू आहे. गेल्या महिन्यात धरणातील १ लाख डंपर गाळ काढून तेवढीच पाणी साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे. सुमारे ३०० गणेश मंडळांचे कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून सुरू असलेल्या या ‘जय गणेश जलसंवर्धन अभियाना’चे पुणे मॉडेल राज्यभर राबविण्याची आवश्यकता आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी जुन्या पुण्यासाठी १८७९ मध्ये खडकवासला धरण बांधले. त्या वेळी पुण्याची लोकसंख्या एक लाखापर्यंत होती. या धरणाची पाणी साठवण क्षमता चार टीएमसी होती. मात्र, त्यानंतर १९६१ ला पानशेत धरण फुटल्यानंतर गाळ खडकवासला धरणात साठत गेला. सद्य:स्थितीत पुण्याची लोकसंख्या सुमारे ४५ लाख इतकी असून, खडकवासला धरणाची पाणी क्षमता गाळामुळे ६० टक्के कमी होऊन १.७५ टीएमसी झाली आहे. दरवर्षी वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करताना महापालिका व पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाची दमछाक होत आहे. ग्रीन थंबचे संस्थापक कर्नल सुरेश पाटील यांनी महात्मा फुले पाणी चळवळ अभियानांतर्गत खडकवासलामधून लोकसहभागाद्वारे गाळ काढण्याचे अभियान २०१२ ला सुरू केले. दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या पुढाकाराने पुण्याच्या ३०० गणेश मंडळांची साथ मिळाली. मृदू, जल व वृक्षसंवर्धनाचे पुणे मॉडेल राज्यभर राबविण्याची आवश्यकता आहे, असे अपेक्षा चळवळीचे समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ------अनेक वर्षांनंतर खडकवासला धरणाच्या पुनरुज्जीवनाच्या चळवळीसाठी शहरातील सुमारे ३०० गणेश मंडळांचे कार्यकर्ते संघटित होऊन सक्रिय झाले आहेत. जय गणेश जलसंवर्धन अभियानासाठी गणेश मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात शिरीष मोहिते, उदय जगताप, दत्तात्रय देवकर, डॉ. विजय पोटफोडे, पराग ठाकूर, आनंद सराफ, पियुष शहा, विनायक घाटे, सुनील घाडगे व सुनील रासने यांचा समावेश आहे. आता लोकप्रतिनिधी व प्रशासनाने या उपक्रमात सहभागी होऊन धरण पुनरुज्जीवनाची पुणे मॉडेलची राज्यभर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा महेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.