शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

पुण्यात मे महिन्यातील सर्वाधिक दुसरा मोठा अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट्र ते तमिळनाडू दरम्यान निर्माण झालेल्या चक्रीय चक्रवाताचा परिणाम आज पुण्यासह मध्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दक्षिण मध्य महाराष्ट्र ते तमिळनाडू दरम्यान निर्माण झालेल्या चक्रीय चक्रवाताचा परिणाम आज पुण्यासह मध्य महाराष्ट्रात दिसून आला. अनेक ठिकाणी सायंकाळच्या वेळी पावसाने हजेरी लावली. पुण्यात सुमारे तासभर कोसळलेल्या अवकाळी पाऊसाने रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप आले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तब्बल २६.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही गेल्या १० वर्षातील सर्वात मोठा दुसर्‍या क्रमांकाचा मे महिन्यातील पावसाची नोंद आहे. यापूर्वी १४ मे २०१५ रोजी २४ तासात १०२.८ मिमी पावसाची नोंद झाली असून ही आतापर्यंत मे महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद ठरली होती. त्यानंतर आज मोठा पाऊस झाला आहे. लोहगाव येथे ३.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कोल्हापूर ३, नाशिक ०.२, सातारा १०, बुलढाणा ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून शहरात सलग पाऊस पडत आहे़ पण त्याचे प्रमाण खूपच कमी होते. रविवारी सकाळपासून आकाश ढगाळ होते़ दुपारनंतर आकाश ढगांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. त्यानंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहराच्या सर्वच भागात पावसाचा जोर दिसून आला. शहराच्या मध्य व पश्चिम भागात पावसाचा अधिक जोर होता. पूर्व भागात त्यामानाने जोर कमी होता. वडगाव शेरी, नगर रोड, गोखलेनगर, शिवाजीनगर परिसरात पावसाचा जोर दिसून आला. या पावसाचा जोर इतका होता की, काही वेळातच रस्त्यावरुन पाण्याचे लोंढे वाहू लागले. लॉकडाऊनमुळे रस्त्यावर वाहतूक नसल्याने कोणाची तशी अडचण झाली नाही.

५ ठिकाणी झाडपडी

या पावसाबरोबरच वार्‍याचा जोर असल्याने शहरात ५ ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. त्यात सेनापती बापट रोडवर २ ठिकाणी, कल्याणीनगर, कर्वेनगर, मॉडेल कॉलनीत झाडपडीच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कोणाला ही दुखापत झाली नाही.

पुणे शहरात पुढील ३ ते ४ दिवस आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.