शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा गणेशोत्सव होणार अविस्मरणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 07:38 IST

शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून महापालिकेने यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव अविस्मरणीय करण्यात पुढाकार घेतला आहे.

पुणे : शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून महापालिकेने यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव अविस्मरणीय करण्यात पुढाकार घेतला आहे. पाच हजार विद्यार्थ्यांनी एकाच वेळी गणेशमूर्ती तयार करणे तसेच काही हजार युवकांचे ढोल-ताशावादन यातून जागतिक विक्रम करण्यात येणार असून त्याची नोंद गिनीज बुकात व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिकेने आयोजिलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार हेही या वेळी उपस्थित होते. महापौर म्हणाल्या, की सोशल मीडियाचा वापर, खास गणेशोत्सवाचा म्हणून एक शुभंकर, विशेष असे संकेतस्थळ, एवढेच नाही तर फक्त गणेशोत्सवासाठी म्हणून एक मोबाईल अ‍ॅप्लिकेशनही तयार करण्यात येत आहे. या सर्व माध्यमातून यंदाच्या गणेशोत्सवाची पताका जगभरात फडकावी, असा प्रयत्न आहे.१२५ कलाकारांना या काळात पुण्यात निमंत्रित करण्यात येणार आहे. एक उंच ध्वजा शहरात उत्सवकाळात कायम फडकत असेल, देशभरातील विविध १२५ गायकांना एकत्र करून गणेशवंदना सादर करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. या सर्व मार्गांनी गणेशोत्सव अविस्मरणीय करण्यात येईल.उत्सवाच्या सुरुवातीपासूनची म्हणजे थेट १२५ वर्षे असलेली अनेक सार्वजनिक मंडळे आहेत. त्यांनी तसेच अन्य मंडळांनाही, नागरिकांनी त्यांच्याजवळ असलेली गणेशोत्सवाची जुनी छायाचित्रे महापालिकेकडे द्यावीत, त्यांचे श्रमिक पत्रकार संघाच्या साह्याने प्रदर्शन आयोजिण्यात येणार आहे, असे महापौरांनी सांगितले. महापालिकेची देखावा स्पर्धा यापूर्वी फक्त मंडळांसाठीच होती. याही वेळी ती असेल, मात्र यंदा सोसायट्यांच्या गणपतींसाठीही वेगळी स्पर्धाठेवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या किमान महिनाभर आधी सर्व कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहेत, असे महापौरांनी सांगितले.उत्सवकाळात शहरात अनेक ठिकाणी सेल्फी स्पॉट सुरू करण्यात येतील. त्याशिवाय स्नॅप चॅटही असेल. फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, वेबसाईट या सर्व माध्यमांमध्ये पुण्याचा गणेशोत्सव उत्सवकाळात चर्चेत राहील, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे पदाधिकाºयांनी सांगितले. त्यासाठी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. महापालिकेने यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याशिवाय अनेक जण महापालिकेला मदत करणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.