शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीच्या विळख्यातून मुक्त होतेय पुणे

By admin | Updated: January 1, 2015 00:51 IST

दशकापूर्वीपर्यंत ज्या आजाराने जगभरात भीती पसरवली होती, त्या एचआयव्हीच्या विळख्यातून पुणे मुक्त होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.

राहुल कलाल - पुणेदशकापूर्वीपर्यंत ज्या आजाराने जगभरात भीती पसरवली होती, त्या एचआयव्हीच्या विळख्यातून पुणे मुक्त होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांत पुण्यातील एड्सग्रस्तांची संख्या घटत असल्याचे दिसून आले आहे. पुण्यात एचआयव्हीचा संसर्ग होण्याचे प्रमाणही खूप होते. २०१३ मध्ये २ हजार २७१ जणांना एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. हे प्रमाण कमी करण्यासाठी समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या. त्यामुळे २०१४ या वर्षात हे प्रमाण झपाट्याने घटून १ हजार ५५८ रुग्णांपर्यंत खाली आहे. या आजाराबाबत जनजागृती झाल्याने ही संख्या घटत असल्याचे चित्र आहे. हे सकारात्मक चित्र तयार करण्यामध्ये सरकारी स्तरावरील योजनांसह स्वयंसेवी संस्थांचा मोठा सहभाग आहे. सन २०१३ मध्ये महिन्याकाठी अडीचशे ते तीनशे रुग्ण शहरात सापडत होते. मात्र, २०१४ मध्ये हे प्रमाण घटून दोनशेच्या घरांमध्ये आले.चांगल्या उपचारामुळे वयोमानही वाढलेएचआयव्ही पूर्णपणे बरा होणारे औषध अजूनही विकसित करण्यात न आल्याने एचआयव्हीने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण दशकापूर्वी खूप मोठे होते. मात्र, विविध औषधांचा वापर उपचारामध्ये वाढला. या औषधांमुळे एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णांचे वयोमान वाढले आहे.समाजाची स्वीकारण्याची क्षमता वाढतेयएड्सग्रस्त व्यक्तीशी कोणीही बोलत नव्हते. त्यांना समाजातून बहिष्कृत केले जात होते. मात्र, हा आजार हात लावण्याने पसरत नसल्याबाबत जनजागृती झाल्याने एड्सग्रस्त लोकांना स्वीकारण्याची क्षमता वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.