शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

पुणे-दौंड विद्युत लोकल वर्षभरात धावेल

By admin | Updated: April 29, 2017 04:00 IST

पुणे ते दौंडदरम्यान साधारणत: वर्षभरात विद्युत लोकल धावेल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

दौंड : पुणे ते दौंडदरम्यान साधारणत: वर्षभरात विद्युत लोकल धावेल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. खुटबाव (ता. दौंड) येथील रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्मच्या बांधकाम भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या.खुटबाव, कडेठाण, मांजरी या तीन रेल्वेस्थानकात नव्याने प्लॅटफॉर्म उभारणीसाठी ६ कोटी रुपये रेल्वे प्रशासनाने मंजूर केले आहेत. पुणे ते दौंडदरम्यानच्यारेल्वेस्थानकात लोकलसाठी उपयुक्त असे प्लॅटफॉर्म आहेत. मात्र मांजरी, कडेठाण, खुटबाव येथे लोकलला उपयुक्त असे प्लॅटफॉर्म नसल्याने विद्युतीकरण होऊनदेखील विद्युत लोकल सुरू करता येत नाही. तेव्हा खुटबाव, मांजरी, कडेठाण या रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म उभारणीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने प्लॅटफॉर्मसाठी ६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. परिणामी प्लॅटफॉर्मचे बांधकाम पूर्ण होताच तातडीने या मार्गावर विद्युत लोकल धावेल, असे सुळे म्हणाल्या.या वेळी प्लॅटफॉर्म उभारणीचे ठेकेदार म्हणाले, की साधारणत: ९ महिन्यांत कडेठाण, खुटबाव, मांजरी प्लॅटफॉर्म उभारणीचे काम पूर्णत्वाकडे जाईल. या वेळी माजी आमदार रमेश थोरात, सभापती मीना धायगुडे, सरपंच शिवाजी थोरात, अप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, राणी शेळके, मधुकर दोरगे, नितीन दोरगे, सोहेल खान, योगिनी दिवेकर, सरपंच अरुणा दिवेकर, रामदास दिवेकर, महेश भागवत, लक्ष्मण दिवेकर, रामभाऊ टुले, मनोज काकडे, उद्धव फुले, राजू उगले, अलोक उगले, भाऊसाहेब ढमढेरे, प्रवीण शिंदे, सुनील फरगडे, लक्ष्मण सातपुते, कमल परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तसेच कडेठाण (ता. दौंड) रेल्वेस्थानकात भूमिपूजन करण्यात आले. (वार्ताहर)