शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

पुणेकरांची होतेय व्हाया एअर फसवणूक

By admin | Updated: April 15, 2015 00:53 IST

काही गुंठे जागेसाठी एक कोटी रुपयांचे डिपॉझीट.... एक लाख रुपयांचे महिना भाडे.... अशी एका रात्रीत उच्चभ्रू वर्गात जाण्याची संधी नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून येत असेल,

पुणे : काही गुंठे जागेसाठी एक कोटी रुपयांचे डिपॉझीट.... एक लाख रुपयांचे महिना भाडे.... अशी एका रात्रीत उच्चभ्रू वर्गात जाण्याची संधी नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून येत असेल, तर सहाजिकच कोणीही प्रयत्न करेल. मानवी स्वभावाच्या याच मानसिकतेचा फायदा घेऊन लाखो रुपयांना गंडा घालणारी टोळी पुण्यात राजरोस लूट करीत आहे. गणेश पेठेतील नझीर शेख यांच्याबाबत असाच प्रकार घडला आहे. ‘मोबाईल टॉवरसाठी जागा पाहिजे,’ असे सांगितले गेले. त्यात एक कोटी रुपयांचे डीपॉझीट व एक लाख रुपये महिना भाडे देण्याचा उल्लेख होता. शेख यांची रांजणगाव एमआयडीसी येथे एक गुंठा जागा आहे. मोठी रक्कम असल्याने त्यांनी तत्काळ संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला. कंपनीच्या प्रतिनिधीने जागेचे लोकेशन व इतर माहिती विचारली. तसेच, सॅटेलाईटवरून जागा चेक करून कंपनीची संमती आल्यावर फोन करतो, असे सांगितले. त्यानुसार संबंधित प्रतिनिधीने तुमची जागा सिलेक्ट झाल्याचा संदेश दिला. इतकेच काय तर संचार निगम टॉवर लिमिटेड कंपनीच्या संचालकांची स्वाक्षरी असलेला लेटरहेड, एका नामांकित कंपनीचा मोबाई टॉवर बसविण्याबाबतचा उल्लेख, इतकेच काय तर १५ वर्षांसाठी एक कोटी रुपये जागेचे डिपॉझीट व एक लाख महिना भाडे मंजूर झाल्याचे त्यांना ई-मेलवरून कळविण्यात आले. अटी-शर्तींचा उल्लेख असलेल्या पंधराशे रुपयांच्या मुंद्राकाची स्कॅन कॉपीदेखील पाठविण्यात आली. यामुळे शेख यांचादेखील विश्वास बसला. कंपनीने नोंदणी फी म्हणून सुरुवातीस २,१०० रुपये घेतले. त्याची रीतसर पावतीदेखील त्यांना देण्यात आली. त्यानंतर सरकारला करापोटी साडेअठरा हजार रुपये भरावे लागतील, असे सांगून ते पैसेदेखील घेतले. इतकेच काय, तर विविध बिलांपोटी २० हजार रुपये बँक खात्यात भरण्यास सांगितले. पैसे भरूनही मोबाईल टॉवर बसविण्याची चिन्हे न दिसल्याने त्यांनी संबंधित प्रतिनिधीशी मोबाईलवरून संपर्क साधला असता, मोबाईल बंद होता. यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी शेख यांनी ३० मार्च रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून, पोलिसांनी संबंधित कंपनीच्या अमित कुमार व कृष्णकुमार या आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीचा हा नववा गुन्हा....मोबाईल टॉवरचे आमिष दाखवून फसवणुकीचा शेख यांचा नववा गुन्हा पोलीस दफ्तरी दाखल झाला आहे. शिवाजीनगर (२०११), खडकी (२०१२), वारजे-माळवाडी, मार्केट यार्ड भारती विद्यापीठ, सांगवी ( सर्व २०१३), लष्कर (२०१४), बंडगार्डन (२०१४) या पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते अजहर खान यांनी माहिती अधिकारात ही माहिती उघड केली आहे.