शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याला मिळू शकते ३० टीएमसी पाणी

By admin | Updated: March 22, 2017 03:05 IST

पिण्याच्या भीषण पाणी टंचाईचा गतवर्षी सामना केल्यानंतरही पुण्यात पुन्हा यंदा पाणी दोन वेळा द्यायचे की एक वेळा यावरून राजकीय वाद सुरू आहेत.

राजू इनामदार / पुणेपिण्याच्या भीषण पाणी टंचाईचा गतवर्षी सामना केल्यानंतरही पुण्यात पुन्हा यंदा पाणी दोन वेळा द्यायचे की एक वेळा यावरून राजकीय वाद सुरू आहेत. मात्र या पाणी टंचाईवरूनच बोध घेऊन केंद्र सरकारच्या हैद्राबादस्थित नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी यांनी भविष्यातील पुण्याची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन तीन प्रकल्प अहवाल तयार केले आहेत, त्यावर साधी चर्चा करण्याचेही राजकारण्यांकडून टाळले जात आहे. यातील एका जरी प्रकल्पाची आजमितीस सुरूवात झाली तर पुढील १० वर्षात ते काम पुर्ण होऊन त्यातून किमान २५ ते ३० टीएमसी पाणी पुण्याला उपलब्ध होऊ शकते. मात्र त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. पुण्याला सध्या खडकवासला धरणसाखळीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सध्याची पुण्याची लोकसंख्या साधारण ३५ लाख आहे. पिण्याच्या पाण्याची रोजची गरज १२५० दशलक्षलीटर इतकी आहे. वार्षिक गरज १५ टीएमसी आहे. खडकवासला धरणाची क्षमता १.९७ टीएमसी इतकी आहे. त्यात पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणातून पाणी साठा येत असतो. या चारही धरणांची एकूण पाणीसाठवण क्षमता २९ टीएमसी इतकी आहे. पुणे शहराशिवाय या धरणांमधून पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर अशी गावे यांनाही पाणी दिले जाते. शेतीसाठी वेळोवेळी आवर्तने सोडली जातात. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळावे यासाठी पुण्याला झगडावे लागते. त्यातून वाद निर्माण होतात.एखाद्या संस्थेच्या, किंवा सरकारी कार्यालयाच्या स्तरावर तयार झालेल्या प्रस्ताव किंवा प्रकल्पांना त्यांचा राजकीय स्तरावर विचार होत नाही तोपर्यंत फार महत्व दिले जात नाही. राजकीय स्तरावर विचार होईपर्यंत त्या प्रस्तावाची गरज संपून नव्याने प्रस्ताव तयार करण्याची वेळ येते. किमान पाण्याच्या प्रस्तावांबाबत तरी हा प्रकार होऊ नये असे अधिकाऱ्यांना वाटते. पुणे हे देशातील आठव्या क्रमांकाचे शहर झाले आहे. भविष्यातील लोकसंख्या ५० लाखांपेक्षा जास्त होईल असा अंदाज आहे. या लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरवायचे असेल तर या तिन्हीपैकी एका प्रकल्पाचा तरी आतापासूनच विचार करावा लागेल असे अधिकारी सांगतात. सध्या केंद्रापासून ते थेट महापालिकेतपर्यंत एकाच पक्षाची सत्ता आहे. त्यांनी मनावर घेतले तर या प्रकल्पांचा किमान विचार तरी करायला सुरूवात होऊ शकते असे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.