शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

उठा पांडुरंगा, दर्शन द्या सकळा!

By admin | Updated: November 2, 2015 00:39 IST

जुनी सांगवीत समस्त गावकरी भजनी मंडळ व मारुती मंदिर ट्रस्टच्या वतीने मारुती मंदिरामध्ये व पिंपळे गुरवच्या भैरवनाथ मंदिरामध्ये समस्त गावकरी विठ्ठल

पंचावन्न वर्षांपासूनची परंपराजुनी सांगवीत समस्त गावकरी भजनी मंडळ व मारुती मंदिर ट्रस्टच्या वतीने मारुती मंदिरामध्ये व पिंपळे गुरवच्या भैरवनाथ मंदिरामध्ये समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळ व पिंपळे गुरव ग्रामस्थांच्या वतीने काकडा मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जुनी सांगवीत १९५९ पासून सालाबादप्रमाणे दर वर्षी काकडारतीनिमित्त पहाटे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ५५ वर्षांपूर्वी पिंपळाच्या झाडाखाली एक पुरातन मंदिर होते. आज मात्र भव्य स्वरूपात दुमजली इमारतीसह आकर्षक असा सभामंडप उभारलेला दिसतो. याच मंदिरामध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर असून सकाळी ४ वा. ४५ मिनिटांनी काकडा सुरू होतो. यानंतर मूर्तीला स्रान व महापूजा केली जाते. सकाळी ६ ला काकड्याचे भजन सुरू होते. दररोज एका गावकऱ्याला महापुजेचा मान दिला जातो. वीणेकरी मनोहर पवार, अशोक ढोरे, शिवाजी ढोरे, सतपाल ढोरे, युवराज ढोरे, रमेश कड, बाळासाहेब शितोळे, रमेश ढोरे, कुमार ढोरे, राजू ढोरे, रोहिदास ठाकर, महादेव पाटील, उमेश पोंगडे, दत्तात्रय ढोरे आदी संयोजन करतात. पिंपळे गुरवच्या भैरवनाथ मंदिरात समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळ व पिंपळे गुरव ग्रामस्थांच्या वतीने पहाटे ४ला काकड्यास प्रारंभ होतो. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते दररोज स्रान व महापूजा करण्यात येते. पन्नास वर्षांपासून भारतीय संस्कृती परंपरा जतन केली जाते. वर्षभर प्रत्येक शनिवार, एकादशीला भजन व कीर्तनाचे कार्यक्रम पार पाडले जातात. या वेळी गावातील महिलांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. २६ नोव्हेंबरपासून ४ डिसेंबरपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कालाष्टमी महोत्सवाचे आयोजन केले आहे. नगरसेवक राजेंद्र जगताप, मााजी नगरसेवक शंकर जगताप, पोपट जगताप, जयवंत देवक र, आत्माराम नवले, जगन्नाथ जगताप, मनोहर जगताप, मुरलीधर कदम, विठ्ठल भोसले, शशिकांत नवले, श्याम झगडे, मारुती जांभूळकर, हनुमंत जगताप, आदेश नवले आदी कार्यक्रमाचे संयोजन करतात. जुनी सांगवीत समस्त गावकरी भजनी मंडळ व मारुती मंदिर ट्रस्टच्या वतीने दैनंदिन भजनाचा कार्यक्रम सादर केला जातो. दरम्यान आयटीजन्सही काकडारतीसाठी गर्दी होत आहे. परिसरात जागांचे भाव वाढले असूनही परंपरा जोपासना केली जात आहे, असे चित्र परिसरात दिसत आहे.इस्कॉन मंदिर, रावेत रावेत : येथील इस्कॉन मंदिरात पहाटे चारपासून काकडारतीला प्रारंभ होत असून, यामध्ये मंगल आरती श्रीमत भागवत वर्ग, मंगल भोग आरती, राजभोग आरती, वैकालिका आरती, गौर आरती, शयन आरती, श्री स्नान, कीर्तन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या वेळी अनेक बालगोपाळ भक्तासह महिला व वृद्ध भाविकांची वर्दळ मंदिरात दिसू लागली आहे. कार्तिक मासानिमित्त मंदिरावर रोषणाई केली आहे.वाल्हेकरवाडी परिसरवाल्हेकरवाडी : गावठाणातील विठ्ठल मंदिर, सायली कॉम्प्लेक्स येथील दत्त मंदिर, बिजलीनगर येथील विश्वेश्वर मंदिर, पुनावळे येथील सावता माळी मंदिर या ठिकाणी अभंग गायले जात आहेत. तर काही ठिकाणी काकडारतीच्या अभंग रचना सुरेख आवाजात गायल्या जात असल्याने पहाटेचे वातावरण मंगलमय झाले आहे. वारकरी व भजनी मंडळी भजनी मालिकेतील मंगलाचरण काकडारतीच्या अभंगांना वेगवेगळ्या चालींत गात असल्याने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. मोशीमध्ये भक्तिमय वातावरणमोशी : येथील श्री नागेश्वरमहाराज सभामंडपामध्ये काकडारतीला सुरुवात झाली असून, पहाटेपासून भक्तिमय वातावरणाने दिवसाची सुरुवात होत असल्याचे दिसून येत आहे. मोशीला अनेक वर्षांपासून काकडारतीची परंपरा लाभली आहे. काकडारतीची परंपरा आजही सुरू आहे. काकडारतीला मंदिरापुढे रांगोळी काढली जाते. गावातील नागेश्वर महाराज मंदिर, भैरवनाथ महाराज, दत्त मंदिरामध्ये पूजाअर्चा केली जाते.खडकीमध्ये विविध कार्यक्रमखडकी : खडकी, बोपोडी, साप्रस, रेंजहिल्स, संगमवाडी परिसरातील विविध मंदिरात काकडा आरतीचा कार्यक्रम होत आहे. दार्जिगल्ली येथील विट्ठल मंदिर धोबिगल्ली येथील मरिमाता मंदिर मुळारोड येथील मरिआई देवी शितला माता मंदिर नादिजवळील लक्ष्मी नारायण मंदिर श्रीराम मंदिर देवस्थान इंदिरा नगर, येथील गणेश मंदिर बोपोडी येथील माताचे मंदिर, औंध, रेँजहिल्स येथे काकडरती घेतली जाते.(प्रतिनिधी)