शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

पाचशे-हजारामुळे पुणेकर कुडकुडले

By admin | Updated: November 11, 2016 01:53 IST

थंडी सुरू झाली, की नागरिकांची पावले स्वेटर खरेदीकडे वळतात. विविध प्रकारचे रंगबेरंगी स्वेटर खरेदी करण्यावर नागरिकांचा भर असतो.

पुणे : थंडी सुरू झाली, की नागरिकांची पावले स्वेटर खरेदीकडे वळतात. विविध प्रकारचे रंगबेरंगी स्वेटर खरेदी करण्यावर नागरिकांचा भर असतो. यंदा मात्र ५०० व १०००च्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे सुट्या पैशांच्या टंचाईमुळे नागरिकांना कुडकुडतच थंडीचे स्वागत करावे लागत आहे.स्वेटर विक्रते व नागरिकांना या निर्णयाचा फटका बसला आहे. सुटे पैसे नसल्याने नागरिकांना स्वेटर खरेदी करता येत नाही. तर, विक्रेत्यांना ग्राहकांकडे सुटे पैसे नसल्याने सोडून द्यावे लागत आहे. थंडीच्या सुरुवातीला लक्ष्मी रस्त्यावरील स्वेटरचे स्टॉल गर्दीने फुलून जातात; यंदा मात्र या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय. अशीच परिस्थिती पुण्याच्या विविध भागांत पाहायला मिळत आहे. स्वेटरची किंमत साधारण ३०० ते २०००च्या दरम्यान असल्याने एखाद्याने ८००चा स्वेटर घेतला, तर विक्रे त्याला देण्यास लोकांकडे ५०० व १०००च्या नोटांऐवजी सुटे पैसे नाहीत, काही विक्रेते गुरुवारी ५०० व १०००च्या नोटा स्वीकारत होते; मात्र त्यांच्याकडीलही सुटे पैसे संपल्याने ग्राहकांना नाही म्हणावे लागत होते. त्यामुळे स्वेटर व्यावसायिकांच्या विक्रीला ऐन थंडीत फटका बसला आहे. सुटे पैसे नसल्याने या विक्रेत्यांना नुसते बसून राहावे लागत आहे.(प्रतिनिधी)