शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘पल्स’ गुंतवणूकदारांच्या तक्रारी

By admin | Updated: November 22, 2014 00:26 IST

सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) चौकशी सुरू केलेल्या पल्स कंपनीच्या विविध योजनांमध्ये पुण्यातील गुंतवणूकदारांनीही मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे.

पुणे : सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) चौकशी सुरू केलेल्या पल्स कंपनीच्या विविध योजनांमध्ये पुण्यातील गुंतवणूकदारांनीही मोठी गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या पुण्यातील कार्यालयाला कुलूप लावण्यात आलेले असल्यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. आतापर्यंत डेक्कन पोलिसांकडे तब्बल ५० जणांनी तक्रारी दिल्या आहेत.मोठ्या परताव्याच्या आमिषाने हजारो कोटी रुपयांची माया गोळा करणाऱ्या पर्ल्स अ‍ॅग्रोटेक कॉर्पोरेशन लि. (पल्स) या कंपनीने गाशा गुंडाळला आहे. अनेक गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी सेबीने या कंपनीची चौकशी सुरू केली आहे. करचुकवेगिरी, मनी लाँड्रिंगसह अनेक गैरव्यवहारांच्या चौकशीकरिता सीबीआयने एक समिती नेमली आहे. सेबीने आॅगस्ट २०१४ मध्ये सादर केलेल्या चौकशी अहवालात कंपनीवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. साखळी पद्धतीने यापुढे पैसे गोळा करण्यास सेबीने कंपनीला प्रतिबंध केला होता. तसेच तीन महिन्यांत गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचे आदेशही दिले होते. या मुदतीत पैसे परत न केल्यास संचालक व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला होता. परंतु गुंतवणूकदारांना अद्याप पैसे परत मिळाले नाहीत.एजंटद्वारेच हजारो कोटी रुपये कंपनीने गोळा केल्यामुळे एजंट्ससहित गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. यातीलच कोल्हापूर व सोलापूर येथील काही एंजट्सनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.पुण्यातील गुंतवणूकदारांनी कंपनीच्या डेक्कन परिसरातील कार्यालयात धाव घेतली. मात्र, कार्यालयाला कुलूप असल्यामुळे शेवटी डेक्कन पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार देण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या कार्यालयाच्या दरवाजावर नोटीस लावली असून, तक्रार द्यायची असल्यास त्यांनी डेक्कन पोलिसांशी संपर्क साधण्याच्या सूचना नोटीसीमध्ये देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)