पुणे : महापालिका निवडणुकीत सर्वच उमेदवार जोरदारपणे प्रचाराला लागले आहेत़ विविध पक्षांतील चारही उमेदवार एकत्रपणे प्रचार करीत असून, चौघांचे एकच पत्रक मतदारांपर्यंत पोहोचविले जात आहे़ मात्र, त्यात केवळ उमेदवारांचीच माहिती दिली जात आहे़ या वेळी चार जणांना मतदान करायचे आहे, याची जुजबी माहिती दिली जाते़ पण, प्रभाग क्रमांक ७ मधील भाजपाने उमेदवारी दिल्यानंतर, पुन्हा काढून घेतल्याने अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या महिला उमेदवाराने आपले पत्रक अधिक वाचनीय व्हावे, यासाठी एक कल्पना लढविली आहे़ त्यांनी पत्रकाच्या मागच्या बाजूला या वेळी चारही जागेसाठी मतपत्रिकांचा रंग पांढरा, गुलाबी, पिवळा आणि निळा असल्याची माहिती दिली आहे़ याशिवाय मतदान कसे करायचे, याचीही माहिती दिली. एरवी उमेदवारांचे पत्रक पाहून न पहिल्यासारखे मतदार करतात़ पण, या उमेदवाराने दिलेली माहिती महत्त्वाची असल्याने ते जपून ठेवले जाऊ लागले आहे़ (प्रतिनिधी)
अपक्ष उमेदवारांची अशीही जनजागृती
By admin | Updated: February 13, 2017 02:09 IST