शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक, नागरिकांकडून आॅनलाइन वीजभरणा

By admin | Updated: October 25, 2016 06:28 IST

सध्याच्या घाईगडबडीच्या काळात महावितरणचे बिल भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहणे नागरिकांना नकोसे वाटत आहे. यामुळे आता अनेक नागरिक आॅनलाइन वीजभरणा

पिंपरी : सध्याच्या घाईगडबडीच्या काळात महावितरणचे बिल भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहणे नागरिकांना नकोसे वाटत आहे. यामुळे आता अनेक नागरिक आॅनलाइन वीजभरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. शहरात महावितरणचे पिंपरी व भोसरी असे दोन विभाग आहेत. शहरातील १ लाख ३६ हजार २७७ वीजग्राहकांनी सप्टेंबर महिन्यात २३ कोटी १३ लाख रुपयांचा आॅनलाइन वीजबिल भरणा केला. यात पिंपरी विभागात ९१ हजार २५८ ग्राहकांनी १२ कोटी ५३ लाख रुपयांचा आॅनलाइन भरणा केला आहे. पुणे परिमंडलात सर्वाधिक आॅनलाइन भरणा पिंपरी विभागात होत आहे. यासह भोसरी विभागात ४५ हजार १९ वीजग्राहकांनी १० कोटी ६० लाख रुपयांच्या देयकांचा आॅनलाइन भरणा केला आहे. महावितरणने संकेत स्थळासोबतच मोबाइलधारकांसाठी अ‍ॅपद्वारे वीजबिले भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आॅनलाइन भरणाकडे वीजग्राहकांचा कल वाढत आहे. आॅनलाइन बिल पेमेंट सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच महावितरणने आॅगस्ट २०१५मध्ये स्मार्ट मोबाइलधारकांसाठी अ‍ॅपही उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे वीजग्राहकांना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या संकेतस्थळावर तसेच अ‍ॅपवरून वीजबिले भरणा करण्याला ग्राहकांची पसंती वाढली आहे. महावितरणने ग्राहकांना ईमेलद्वारे वीजबिले प्राप्त करण्याची सोय आहे किंवा छापील बिलांऐवजी केवळ ईमेलद्वारे वीजबिल पाहिजे असल्यास गोग्रीन हा पर्याय उपलब्ध आहे. संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)लांबलचक रांगेतून सुटकावीजबिल भरायचे म्हटले की, लांबलचक रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. या त्रासापासून वाचण्यासाठी आता आॅनलाइन वीज भरणा करण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांना अधिक सोयीचे होत आहे. महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या या सुविधेचा नागरिकांनी लाभ घेणे सोपे झाले आहे.