शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालिका सभेतही अणेंचा निषेध

By admin | Updated: March 22, 2016 01:52 IST

विदर्भाबरोबरच मराठवाडा स्वतंत्र करायला हवा, या राज्याच्या महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले

पुणे : विदर्भाबरोबरच मराठवाडा स्वतंत्र करायला हवा, या राज्याच्या महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या वक्तव्याचे पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले. शिवसेनेने या विषयावर तहकुबी मांडली. या तहकुबीला भारतीय जनता पक्ष वगळता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसह सर्वांनी पाठिंबा दिला. भाजपच्या या विरोधाची सभेनंतर बरीच चर्चा झाली.सभेचे कामकाज संपत असतानाच शिवसेनेच्या अशोक हरणावळ यांनी तहकुबीची सूचना मांडली. विदर्भासह मराठवाडाही स्वतंत्र करण्याचे अणे यांचे वक्तव्य महाराष्ट्रद्रोही आहे, याबद्दल ही सभा त्यांचा निषेध करीत आहे, अशी ही तहकुबी होती. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृह नेते बंडू केमसे ही तहकुबी घ्यायला सुरुवातीला तयार नव्हते; मात्र यात भाजपची कोंडी होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर लगेचच त्यांनी तसेच काँग्रेसच्या अरविंद शिंदे यांनी ही तहकुबी स्वीकारत असल्याचे सांगितले व वाचनासाठी ती लगेचच नगरसचिवांकडे दिली.नगरसचिव सुनील पारखी यांनी तहकुबीचे वाचन केले. नियमाप्रमाणे याला कोणाला विरोध आहे का म्हणून विचारणा केली. त्या वेळी सभागृहात भाजपचे गटनेते गणेश बीडकर किंवा ज्येष्ठ नगरसेवक अशोक येनपुरे यांच्यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे उपस्थित सदस्यांपैकी मुक्ता टिळक यांनी आपला याला विरोध आहे, असे म्हणत याच्यावर बोलायचे आहे, म्हणून मागणी केली. महापौर प्रशांत जगताप यांनी मतदान होऊ द्या, मग बोलायला संधी देतो, असे सांगितले. त्याप्रमाणे पारखी यांनी मतदान पुकारले.तहकुबीच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे व सेना यांनी मतदान केले. एकट्या भाजपने विरोध केला. त्यांच्यातील धनंजय जाधव, श्रीनाथ भिमाले तसेच खुद्द मुक्ता टिळकही बराच वेळ विरोध करावा की नाही अशा संभ्रमात होते. मात्र, अखेरीस त्यांनी विरोध केला. ११ विरुद्ध ४० मतांनी ही तहकुबी मंजूर झाली. त्यानंतर मुक्ता टिळक बोलण्याची संधी घेत होत्या, मात्र महापौरच उठून उभे राहिल्यानंतर थेट राष्ट्रगीतच सुरू झाले. नंतर सेना, मनसेकडून भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणून बोल लावण्यात आले, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य ते पाहत उभे होते. (प्रतिनिधी)