शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाला धानोरेकरांचा विरोध

By admin | Updated: May 6, 2017 01:50 IST

आळंदी शहरातील सांडपाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आळंदी नगर परिषदेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : आळंदी शहरातील सांडपाण्याचा गंभीर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आळंदी नगर परिषदेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पासाठी शहराशेजारील धानोरे (ता. खेड) हद्दीतील गायरान जागा मिळण्यासंदर्भात ठराव केला होता. मात्र, धानोरे ग्रामस्थांचा या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पास तीव्र विरोध आहे. कोणत्याही अटीवर हा प्रकल्प गावात होऊ देणार नसल्याची भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे. गावातील विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी तसा ठरावही एकमताने मंजूर केल्याने यापुढे प्रशासनाची नेमकी काय भूमिका असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आळंदीलगत असलेल्या धानोरे गावात सुमारे १२ हेक्टर गायरान क्षेत्र आहे. या उपलब्ध गायरानातील गट क्र. १५२ मधील काही जागा खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारासाठी देण्याबाबतचा ठराव वर्षभरापूर्वी करण्यात आला आहे. तर, २० वर्षांपूर्वी गट क्र. ६४ मधून महाराष्ट्र राज्य महावितरण वीज कंपनीला व गावात नव्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कामासाठी प्रत्येकी १.६० हेक्टर क्षेत्र देण्यात आले आहे.उर्वरित गायरान जागेत गावातील पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून नळ पाणीपुरवठा योजना, समाजमंदिर, घरकुल, शासकीय कार्यालय, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, सुशोभीकरण कामे मार्गी लावायची आहेत. तसेच, गावातील पाळीव जनावरे चरण्यासाठी गायरानात कुरणक्षेत्राची आवश्यकता आहे. त्यामुळे आळंदी पालिकेच्या सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाला आमच्या हक्काची इंचभरही जागा देण्यास गावाचा विरोध राहील.गावातील नागरिकांची गरज लक्षात घेता, गावातील गायरान जागा महत्त्वाची असल्याने ती गावाकरिता ठेवणे योग्य असल्याचे महाराष्ट्र दिनी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. आळंदी नगर परिषदेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पाचा घाट आमच्या गावात घालू नये, अशी मागणी धानोरे ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नळपाणी पुरवठा, घरकुल, समाजमंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, ग्रामीण आरोग्य केंद्र, उपबाजार समिती अशा विविध विकासकामांकरिता आम्हाला आमची गायरान जागा हवी आहे. त्यामुळे आळंदी पालिकेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प त्यांच्याच जागेत करावा. आमच्या गायरानातील इंचभरही जागा आम्ही या प्रकल्पाला देणार नाही. याबाबतचा पत्रव्यवहार आम्ही शासनाकडे केला आहे.- सुंदर गावडे, सरपंच, धानोरेसांडपाणी पुनर्वापर प्रकल्प हा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत करण्यात येणार आहे. नगर परिषद हद्दीतील जागा या प्रकल्पाला कमी पडत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी धानोरे गावातील सरकारी गायरानातील जागा सुचवली आहे. त्यामुळे धानोरेकरांकडून प्रकल्पाला होत असलेल्या विरोधाबाबत शासनच योग्य तो निर्णय घेईल.- वैजयंता उमरगेकर,नगराध्यक्षा, आळंदी नगरपरिषद