शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

दरोडेखोरांच्या हल्ल्यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू

By admin | Updated: September 25, 2014 06:21 IST

पुणे-आळंदी रस्त्यावरील चऱ्होली फाट्याजवळील व्यंकटेश बालाजी मंदिरातील पुजाऱ्याच्या घरावर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकून पाच ते सहा लाखाचा ऐवज लुटण्यात आला

भोसरी : पुणे-आळंदी रस्त्यावरील चऱ्होली फाट्याजवळील व्यंकटेश बालाजी मंदिरातील पुजाऱ्याच्या घरावर बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकून पाच ते सहा लाखाचा ऐवज लुटण्यात आला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात नामदेव भगवंत पवार (वय ५४, सध्या रा. शास्त्रीनगर, भोसरी, मूळ मु. पो. रेटवडी, ता. खेड, जि. पुणे) या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला. तर पुजाऱ्यासह तिघेजण जखमी झाले. चिरंतीलाल त्रिवेदी (वय ६८), मनोरमा त्रिवेदी (वय ६५, दोघेही रा. वडमुखवाडी, चऱ्होली) या वृद्ध दाम्पत्यासह तुकाराम काटे हे सुरक्षारक्षक दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. पोलीस निरीक्षक एन.के. घुगरे यांनी दिलेली माहिती अशी : पुणे-आळंदी रस्त्यावर चऱ्होलीजवळ व्यंकटेश बालाजी मंदिर आहे. या मंदिरात पहाटे तीनच्या सुमारास दरोडेखोर पाठीमागील बाजुने शिरले. आत येत असताना पवार यांनी त्यांना हटकले असता दरोडेखोरांनी त्यांना लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मंदिराच्या समोरील बाजूच्या खोलीत खोलीत असलेल्या तुकाराम काटे यांना मारहाण करून त्याच खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील त्रिवेदी यांच्या खोलीचा दरवाजा तोडून तिजोरी उघडली. त्यातील एक मुकुट व देवाच्या पोशाखासह पुजाऱ्याच्या पत्नीचे पाच ते सहा लाखांचे दागिने चोरले. त्यानंतर त्रिवेदी दाम्पत्याला मारहाण दरोडेखार पसार झाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना उपचारासाठी संत तुकारामनगर येथील पिंपरी चिंंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, पवार यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली असून अधिक तपास करीत आहेत. भगवान बालाजीसाठी एक पोशाख तयार करण्यात आला होता. त्याला कलाकुसर केली होती व अमेरिकी डायमंड लावलेले होते. त्याची अंदाजे किमत १० लाखांच्या आसपास आहे, अशी माहिती मंदिर प्रमुख डॉ. महेंद्र शर्मा यांनी सांगितले. (वार्ताहर)