शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

दैवाच्या फे-यात अडकलेल्या अल्पवयीन मुलीला जुंपले वेश्याव्यवसायाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 14:38 IST

आईच्या आत्महत्येनंतर सतत तीन वर्ष वडीलांकडून बलात्कारासारखे अत्याचार सहन केल्यानंतर मावशीने सांभाळ करण्यासाठी घरी नेलेल्या 16 वर्षीय मुलीला काकानेच वेश्याव्यवसायाला जुंपल्याची घटना उघडकीस आली आहे.

पुणे : आईच्या आत्महत्येनंतर सतत तीन वर्ष वडीलांकडून बलात्कारासारखे अत्याचार सहन केल्यानंतर मावशीने सांभाळ करण्यासाठी घरी नेलेल्या 16 वर्षीय मुलीला काकानेच वेश्याव्यवसायाला जुंपल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी छापा टाकून सुटका केल्यानंतर पिडीत मुलीने दिलेल्या जबाबामधून ही बाब समोर आली. काकाला येरवडा पोलिसांनी अटक केली असून वडीलांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी आई-वडीलांसह ताडीवाला रस्ता परीसरामध्ये राहण्यास होती. वडीलांकडून होत असलेल्या त्रासामुळे या मुलीच्या आईने सप्टेंबर 2010 मध्ये आत्महत्या केली. त्यानंतर वडीलांना अटक झाली. अवघ्या दहाव्या वर्षी आईच्या मायेला पोरकी झालेली ही मुलगी वडीलांच्या कारागृहात जाण्यामुळे एकटी पडली होती. तीन वर्षांनंतर तिच्या वडीलांची जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर त्यांनी दुस-या महिलेशी लग्न केले. 2013 मध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली. सलग तीन वर्ष तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरु होते. अत्याचारांना विरोध केला की तिला जीवे ठार मारायची धमकी मिळायची. यामधून एकदा ही मुलगी गरोदर राहीली. त्यावेळी सावत्र आईने पिडीत मुलीलाच धमकी देऊन गप्प केले. तिला गरोदर न राहण्याच्या गोळ्या देऊ लागली. तिचा नीट सांभाळही ते करीत नव्हते. तिला वेळेवर जेवायलाही मिळत नसे. वडीलांकडून होणा-या मारहाण आणि छळाला कंटाळलेली ही मुलगी आत्याकडे मन मोकळं करायची.

आत्याला तिची दया आली. तिने या मुलीला घरी नेले. वर्षभर ही मुलगी त्यांच्याकडे येरवड्यातील एका सोसायटीमध्ये राहात होती. आत्याचे पती टेम्पो चालक असून त्यांना आठ वर्षांची एक मुलगी व चार वर्षांचा एक मुलगा आहे. टेम्पो चालवून चरितार्थ चालविणे अवघड जात असून खर्च दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र या मुलीसमोर उभे करण्यात आले. त्याने घरातील अडचणी सांगत तिला भावनिक करायला सुरुवात केली. देहविक्रय केल्यास चांगले पैसे मिळतील आणि गरीबी दूर होईल असे तो सांगू लागला. तिला देहविक्रयासाठी तयार केल्यानंतर त्याने ग्राहक शोधायला सुरुवात केली. दरम्यान, त्याने आणखी एका सज्ञात मुलीचाही सौदा ठरवला होता. अवघ्या 16 वर्षांच्या मुलीचा त्याने  एक लाख रुपयांमध्ये सौदा ठरवला होता. दरम्यान, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांना पोलीस नाईक प्रदीप शेलार यांच्याकडून या सर्व प्रकाराबाबत माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील, सहायक निरीक्षक शितल भालेकर यांच्या पथकाने बनावट ग्राहकामार्फत आरोपीशी संपर्क साधला. ठरलेल्या ठिकाणावर छापा टाकून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत दोघींची सुटका केली. या मुलींची रवानगी सुधारगृहामध्ये करण्यात आली असून आरोपी काकाविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या मुलीला सुधारगृहामध्ये पाठविण्यात आल्यानंतर जबाब नोंदवित असताना वडीलांकडून होत असलेल्या अत्याचाराला वाचा फुटली. दरम्यान, या मुलीने शाळेमधील वर्ग शिक्षिका यांना याची कल्पना दिली होती. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिकांनाही याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यावेळी दोघींनीही तिच्या आत्याला बोलावून याबाबत विचारणा केली होती. त्याचवेळी याबाबत कारवाई झाली असती तर कदाचित पिडीत मुलीवर वेश्याव्यवसायाला जुंपले जाण्याची वेळ आली नसती.