शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित सर्व्हिस रोड वादात

By admin | Updated: January 22, 2016 01:29 IST

शहरातील काळा ओढा ते कसबा, कारभारी सर्कलपर्यंतचा सर्व्हिस रोड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रस्तावित सेवा रस्त्या

बारामती : शहरातील काळा ओढा ते कसबा, कारभारी सर्कलपर्यंतचा सर्व्हिस रोड वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रस्तावित सेवा रस्त्या (सर्व्हिस रोड) लगत मोठ्या प्रमाणात इमारती झाल्या आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण करून गाळेदेखील बांधण्यात आले आहेत. तरीदेखील, हा प्रस्तावित रस्ता रद्द करण्याची मागणी होत आहे. मिळकतधारकांनी या रस्त्याला हरकती घेतल्या आहेत. काही वर्षांपूर्वी नव्याने बीओटी तत्त्वावर रिंगरोड अंतर्गत रस्तेबांधणी करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय इमारतीचे काम झाले. शाळा व खेळाच्या मैदानाचे आरक्षण बासनात गुंडाळून नाट्यगृहाचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर काळा ओढा ते कारभारी सर्कलपर्यंत सेवा रस्ता करण्याचा ठराव नगरपालिकेने घेतला. त्यावर हरकती सूचना मागविण्यात आल्या आहेत. रिंगरोड अंतर्गत रस्ता झाल्यावर परिसरात बहुतांश हॉस्पिटल झाली आहेत. त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. काहींनी व्यवसाय सुरू केले आहेत, असे असताना सर्व्हिस रस्ता करण्यास नगरपालिका आग्रही आहे. याउलट, या रस्त्यालगत झालेली बांधकामे परवानगी घेऊन केली आहेत. त्यामुळे झालेल्या बांधकामांची पाडापाड होईल. हा सर्व्हिस रस्ता रद्द करून प्रशासकीय इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार इंदापूर रस्त्यालगतच्या डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरून सुरू करावे. प्रशासकीय इमारतीच्या पुढच्या बाजूचे प्रवेशद्वार बंद ठेवून मागच्या दाराने प्रशासकीय इमारतीचे कामकाज चालते. त्याचा नागरिकांनादेखील त्रास होतो. डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोरील मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्याचे प्रयोजन काय, याची माहितीदेखील विचारण्यात आली. मिळकतधारकांच्या वतीने अ‍ॅड. शेखर दाते, अ‍ॅड. केदार पानसे, नगरसेवक सुनील सस्ते यांनी बाजू मांडली. मुख्याधिकाऱ्यांनी मिळकतधारकांच्या हरकतीवर सुनावणी घेतली. (प्रतिनिधी)