शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव

By admin | Updated: March 27, 2017 03:17 IST

शासनाने १९९४ मध्ये बंद केलेल्या ‘इलेक्ट्रोहोमिओपॅथी’ या वैद्यकीय शाखेला पुन्हा मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर

पुणे : शासनाने १९९४ मध्ये बंद केलेल्या ‘इलेक्ट्रोहोमिओपॅथी’ या वैद्यकीय शाखेला पुन्हा मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा आदेश केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिले आहेत. त्यानुसार ‘मेडिकल असोसिएशन आॅफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी’कडून केंद्राला सविस्तर प्रस्ताव ३० जूनपूर्वी सादर करण्यात येणार आहे. यासाठी शासकीय समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाला पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावाबाबत मसुदा तयार करण्याबाबत चर्चा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील ५०० इलेक्ट्रोहोमिओपॅथीच्या चिकित्सकांची बैठक रविवारी पुण्यात पर्वती पायथा परिसरातील मुक्तांगण इंग्लिश स्कूल आॅडिटोरियम येथे आयोजित केली होती. या बैठकीला पंजाब येथील डॉ. अजित सिंग, कोलकत्ता येथील डॉ. देबाशिश कुडूंजी यांनी इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सापद्वतीबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रस्ताव तयार करण्याबाबत ऊहापोह करण्यात आला. या पॅथीचे शिक्षण घेतलेले राज्यात ३० हजार प्रशिक्षणार्थी आहेत. हे शास्त्र ११४ वनस्पतींवर आधारित असून १३८ प्रकारची औषधे तयार करण्यात येतात आणि ते कुठल्याही आजारावर वापरता येतात. उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे प्रशिक्षणार्थी या पॅथीची प्रॅक्टिस करू शकतात, अशी माहिती संघटनेने दिली आहे.भारतातील सर्व इलेक्ट्रोहोमिओपॅथी तज्ज्ञांची बैठक १५ एप्रिल २०१७ रोजी दिल्ली येथे आयोजिण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये संबंधित प्रस्ताव तयार करून त्यावर पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. यानंतर तो प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. सतीश जगदाळे यांनी दिली.